मुक्तपीठ टीम
मुंबईच्या पश्चिम उपगनरातील अंधेरी, विलेपार्ले आणि जोगेश्वरीच्या पूर्व आणि पश्चिम भागातील काही ठिकाणी दोन दिवस पाणी पुरवठा बंद असणार आहे. त्या ठिकाणी पाणी गळती दूर करण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी कमी दाबाने पाणी मिळेल तर काही ठिकाणी पाणी पुरवठा बंद असेल.
जलवाहिनीवरील गळती रोखण्यासाठी मुंबई मनपाने बुधवारी ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते गुरुवारी ७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० पर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम महाकाली गुंफा मार्गावर नंदभवन इंडस्ट्रीजजवळ राबवण्यात येणार आहे. त्यामुळे विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी या उपनगरांच्या पूर्व व पश्चिम भागातील काही परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. तर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
पाणीपुरवठ्याच्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. या गळती दुरुतीचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने येत्या बुधवारी आणि गुरुवारी महापालिकेच्या के/पूर्व आणि के/पश्चिम विभागातील पाणीपुरवठा खंडित करुन, तर काही भागात कमी पाणीपुरवठा करुन हे काम हाती घेण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.