मुक्तपीठ टीम
विविध १८जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ ऐवजी आता १६ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होईल; तर मतमोजणी १४ ऑक्टोबर २०२२ ऐवजी आता १७ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाने ०७ सप्टेंबर २०२२ रोजी १ हजार १६६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील, असेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.