मुक्तपीठ टीम
अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक प्राप्त व्हाइस ॲडमिरल किरण देशमुख यांनी ३१ मे २०२१ रोजी युद्धनौका उत्पादन आणि संपादन नियंत्रक पदाचा कार्यभार स्वीकारला. मुंबईतील व्ही.जे.टी.आय. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले व्हाइस ॲडमिरल किरण देशमुख यांची ३१ मार्च ८६ रोजी भारतीय नौदलात अभियंता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे आणि वेलिंग्टनमधील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ महाविद्यालयाचे ते पदव्युत्तर पदवीधर आहेत.
किरण देशमुख यांची नौदल मुख्यालयातील कर्मचारी, कार्मिक आणि सामग्री शाखेत, चाचणी संस्था, एमओ, नौदल गोदी आणि पूर्व नौदल कमांड मुख्यालयात विविध महत्त्वपूर्ण पदांवर नियुक्ती करण्यात आली होती. देशमुख यांनी विविध क्षमतेमध्ये राजपूत क्लास, दिल्ली क्लास आणि ताबर क्लास यांसारख्या जहाजांवर काम केले आहे. अॅडमिरल देशमुख यांना त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्राप्त झाले आहे.