मुक्तपीठ टीम
भारतातील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनीने (आयएचसीएल) विवांता नवी मुंबई, तुर्भे येथे हॉटेल सुरु करत असल्याची आज घोषणा केली. पारसिक हिल्सच्या पायथ्याशी वसलेले, अतिशय शैलीदार पद्धतीने डिझाईन करण्यात आलेले हे हॉटेल नवी मुंबईतील पहिले ‘विवांता’ आहे.
आयएचसीएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुनीत छटवाल यांनी सांगितले, “देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आपली उपस्थिती अधिकाधिक मजबूत करण्याच्या आयएचसीएलच्या धोरणाला अनुसरून आम्ही हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) असलेले नवी मुंबई हे व्यापारी, शैक्षणिक, क्रीडा आणि मनोरंजनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र बनले आहे. हे हॉटेल नवी मुंबई शहराच्या वेगवान उत्क्रांतीचा एक भाग बनेल अशी आमची आशा आहे.”
१४६ खोल्यांच्या विवांता नवी मुंबई, तुर्भे मधून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. नवी मुंबई परिसरात स्थलांतरासाठी येणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांपासून प्रेरणा घेऊन या हॉटेलचा आधुनिक वास्तुकलेचा आराखडा रचण्यात आला आहे. या हॉटेलमधील मिंट या संपूर्ण दिवसभर सुरु असणाऱ्या डायनरमध्ये अनेक स्थानिक व जागतिक पदार्थांचा आस्वाद घेता येतो. गोडाच्या पदार्थांसाठी स्विर्ल आहे जिथे उत्तम पेस्ट्रीज, केक यांचे अनेक स्वादिष्ट प्रकार चाखायला मिळतील. विंक या आधुनिक, आरामदायी आणि ट्रेंडी रेस्टो-बारमध्ये छान वेळ घालवता येतो. अनेक पुरस्कारांनी नावाजण्यात आलेला जिवा स्पा या हॉटेलच्या रुफटॉपवर उपलब्ध करवून देण्यात आला आहे. तसेच रुफटॉप बार व लाउंजची सुविधा देखील आहे. तब्बल ३२७ चौरस मीटर बँक्वेट परिसर असलेले हे हॉटेल लग्न आणि इतर समारंभांसाठी अगदी योग्य आहे.
विवांता नवी मुंबई, तुर्भेचे महाव्यवस्थापक श्री. विकास परीमू म्हणाले, “आयटी कॉर्पोरेट पार्क्स, मनोरंजनाची विविध ठिकाणे, जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धा, मोठमोठे समारोह ज्याठिकाणी आयोजित केले जातात अशी मैदाने यांच्यापासून अगदी सहज पोहोचण्याजोग्या अंतरावर असल्यामुळे विवांता नवी मुंबई, तुर्भे खूपच सोयीचे आहे. सुट्टीमध्ये मौजमजा आणि आरामासाठी असो किंवा कामासाठी प्रवास करत असलेल्यांसाठी असो, हे हॉटेल सर्वांसाठी अतिशय सुविधाजनक ठरेल. नवी मुंबई शहराचे नवे आकर्षण विवांता नवी मुंबई, तुर्भेमध्ये तुमचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
हे नवे हॉटेल सुरु झाल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) आयएचसीएलच्या हॉटेल्सची संख्या १२ वर पोहोचली आहे, यापैकी तीन हॉटेल्सचे काम सुरु आहे