Wednesday, May 21, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

अभिनेत्री मुक्ता बर्वेची ‘ती’ एक पोस्ट सध्या चर्चेत का?

April 22, 2022
in घडलं-बिघडलं, विशेष
0
'Virus-2 Pune' on storytel marathi in mukta barve voice

मुक्तपीठ टीम

अभिनेत्री मुक्ता बर्वेने मागील अनेक वर्षापासून मालिका, चित्रपट आणि नाटक या माध्यमातून आपले दमदार अभिनय कौशल्याद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यानंतर आता मुक्ता आपल्या अभिनयासोबत आपल्या आवाजाच्या जादूनेही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कथावर्णन करत ती एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे. काही दिवसापूर्वी ‘स्टोरीटेल’ मराठीवर तिची ‘Virus -पुणे’ ही एक सीरिज आली होती. आता याचा दुसरा भाग ‘Virus -२ Pune’ घेऊन ती आपल्या भेटीला आली आहे. नुकतीच तिनं याची माहिती देणारी एक पोस्ट केली आहे. सध्या मुक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

Virus season 2 In voice of mukta barve on storytel marathi

एका जीवघेण्या व्हायरसच्या निमित्तानं पुण्यावर एक भयंकर संकट कोसळलंय. सगळं शहर पत्त्यांसारखं उन्मळून पडत असताना नेहाच्या मुलीला मायराला काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलंय. मायरापर्यंत पोचण्यात, तिचा शोध घेण्यात नेहा, दिव्या, सचिन यशस्वी होतील? न भूतो न भविष्यती अशा या संकटातून ते खरंच बाहेर पडतील? नियतीचा हा जीवघेणा खेळ खरंच संपेल? ‘व्हायरस २ पुणे’ या स्टोरीटेल मराठी वरील ऑडिओ सिरीज विषयीची ही तिची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. चाहते देखीलत मुक्ताच्या या नवीन सीरिजबद्दल विशेष उत्साही आहेत.

‘Virus- पुणे’ या मुक्ताच्या सीरीजच्या पहिल्या सिजनला कमाल लोकप्रियता मिळाली होती आणि त्यामुळे दुसऱ्या सीजनची  सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुक्ताच्या दुसऱ्या सिझनला स्टोरीटेलवर अद्भुत असा प्रतिसाद मिळत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी आलेल्या मुक्ताच्या‘अॅडिक्ट’ या पहिल्या सीरिजलाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. यामध्ये डॉ. रक्षा नावाच्या एका महिलेची ती गोष्ट सांगण्यात आली होती. जिच्या आयुष्यात ती अशा एका घटनेला सामोरे जाते त्यानंतर त्याचे तिला व्यसन लागते. मात्र, हे काही ड्रग्ज, अल्कोहोल इत्यादींचे व्यसन नाही. तिच्या या विचित्र व्यसनामुळे तिचे आयुष्य रंजक आणि भयानक वळण घेते.

तीन ते चार वर्षापूर्वी डॅनियल ॲाबर्ग यांनी प्रथम ‘Virus – Stockholm’ स्विडीश भाषेत लिहीली. त्यावेळी ती एक परिपूर्ण Sci-Fi सिरीज होती, पण दोन वर्षांपूर्वी कथेतला काही अंश थेट वास्तवातच आला आणि पहिल्यांदाच Sci-fi genre ची भिती वाटली. त्यामुळे ही सिरीज मराठी भाषेत आली पाहिजे असं ‘स्टोरीटेल मराठी’ला प्रकर्षाने जाणवलं. आठ ते नऊ महिन्याच्या मेहनतीनंतर डिसेंबर २०२२ ला पहिल्यांदा ‘Virus-पुणे’ स्टोरीटेलवर रिलीज झाली. निरंजन मेढेकरयांनी लिलया पेलत आणि मोहिनी वाघेश्वरी यांनी काटेकोरपणे स्क्रिप्टवर काम करून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारं लिखाण केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुक्ता बर्वेने दिलेलं नॅरेशन. मुक्ताच्या आवाजामुळे ही सिरीज आपण ऐकत नसून हे सर्व आपल्या आजूबाजूला घडतंय असं जाणवतं”.

‘Virus – Stockholm’ च्या मराठी भावानुवादावर या मूळ कथेचा लेखक डॅनियल भलताच खुश आहे. त्याला मराठीतील हे सादरीकरण प्रचंड आवडलं आहे आणि विशेष म्हणजे मुक्ता बर्वेच्या दमदार आवाजातील चित्तथरारक ऐकून तो तिचा जबरदस्त फॅन झाला आहे.

https://www.instagram.com/p/CccYvEfLuoD/

https://www.instagram.com/p/CceuC_pKsXj/

https://www.instagram.com/p/Cca870gPQa9/

https://www.facebook.com/storytelmarathi/videos/1114921372410248/

https://www.facebook.com/storytelmarathi/videos/509058183349656

व्हायरस पुणे – सिझन 2, मुक्ता बर्वेच्या आवाजात

ऐकण्यासाठी लिंक – https://www.storytel.com/…/books/virus-pune-s02e01-1704865


Tags: Mukta barveScifiStoryTel MarathiThrillerVirus-2 Puneमुक्ता बर्वे
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेसह भाजपा, एमआयएमला धक्का, नगरसेवकांनी बांधलं घड्याळ!

Next Post

#मुक्तपीठ #Live “आयटी-ईडी नोटीस आलेले कुणीच चोरी केली नाही, असं का म्हणत नाही?”- आशिष शेलार

Next Post
#मुक्तपीठ #Live   “आयटी-ईडी नोटीस आलेले कुणीच चोरी केली नाही, असं का म्हणत नाही?”- आशिष शेलार

#मुक्तपीठ #Live "आयटी-ईडी नोटीस आलेले कुणीच चोरी केली नाही, असं का म्हणत नाही?"- आशिष शेलार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!