मुक्तपीठ टीम
राज्यात पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापले आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठाआरक्षणाच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वडेट्टीवार हे जातीयवादी माणूस आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी. तेसच मागासवर्गीय आयोग हा जातीयवादी आयोग आहे, त्यामुळे तो बंद करावा, अशी मागणीही मेटे यांनी यावेळी केली.
काय म्हणाले विनायक मेटे?
- मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाकडून आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं.
- त्यावेळी आम्ही आज धरणे आंदोलन करुन सरकारला फक्त इशारा दिलाय.
- जर आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाहीत तर २३ तारखेपासून अहमदनगरपासून आंदोलनाला सुरुवात करू.
मेटेंची मागणी
- शिवस्मरकाचे काम अद्यापही सुरु झालेलं नाही. महाराजांच्या नावे राजकारण करणाऱ्यांना स्मारकाचा विसर पडला.
- शिवस्मारकाचं कामही लवकरात लवकर सुरू व्हायला हवं.
- छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन शिवसेना सरकारमध्ये आली.
- मात्र, छत्रपतींच्या स्मारकाबाबत गेल्या २ वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी २ मिनिटंही वेळ दिला नाही.
- शिवस्मारकाचा विषयही निष्क्रिय मंत्री अशोक चव्हाण यांच्या खात्याकडे असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
- मुख्यमंत्री यांचे मराठा समाजाबद्दल असलेले प्रेम हे बेगडी व पुतणा मावशीचे आहे.