मुक्तपीठ टीम
राज्यात गेले काही दिवस आर्यन खान ड्रग्स प्रकरण चांगलचं चर्चेत आहे. अखेर तीन आठवड्यानंतर आर्यन खानला जामीन मिळाला या प्रकरणी आघाडी सरकारचे अनेक नेते एनसीबी आणि भाजपा सरकारवर टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी ‘उद्धवा… अजब तुझे सरकार’ असं म्हणत आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. आर्यन खान नंतर वेळ मिळाला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहा, असा टोला मेटे यांनी सरकारला लगावलाय.
मेटेंचा इशारा
- बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केलीय.
- बीड जिल्ह्यात केवळ दहा महिन्यातच १५९ आत्महत्या झाल्या आहेत.
- जिल्हा प्रशासनासाठी आणि सरकारसाठी ही लाजिरवाणी बाब आहे.
- प्रशासनाने किती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन चौकशी केली?
- तर दिवाळीनंतर शिवसंग्राम रस्त्यावर उतरणार असून हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही.
पुणे महानगरपालिकेची चर्चा सर्वात जास्त रंगलीय
- उद्या पुण्यात शिवसंग्रामचा पदाधिकारी मेळावा
- कोरोना नियम शिथिल होताच राज्यात वेगवेगळ्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे.
- सहकारी संस्था, जिल्हा बँका, पोटनिवडणुका अशा अनेक प्रकारच्या निवडणुका राज्यात होत आहेत.
- तर आगामी काळात राज्यातील प्रमुख शहरांच्या पालिका निवडणुकादेखील येऊ घातल्या आहेत.
- यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही पुणे महानगरपालिकेची रंगलीय.
- पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे.
- ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने योजना आखत आहे.
- याच पार्श्वभूमीवर विनायक मेटेंचा शिवसंग्राम ही निवडणूक ताकदीने लढवणार आहे.