मुक्तपीठ टीम
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सुलतानपूरमधील गावकऱ्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी जनसहकार्याचा नवा आदर्श ठेवला आहे. या गावच्या गावकऱ्यांनी शाळेला कोरोनाशी लढण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी सॅनिटायझर मशिन, टेम्परेचर चेकर गनमशिन भेट दिली.
कोरोना पुन्हा वाढू लागल्याने गावातील पालक चिंतातूर झाले होते. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि शिक्षकांनाही कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यावर गावातील सरपंच आशाताई मोहन आवासे, उपसरपंच वसंत कापडे आणि ग्रामसेवक राजेंद्र.व्ही.पाडवी यांनी विचार केला. शाळेतील शिक्षक आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी शाळेला कोरोनाप्रतिबंधक साधने देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांच्याच हस्ते शाळेला सॅनिटायझर मशिन, टेम्परेचर चेकर गनमशिन भेट देण्यात आली. तसेच जिल्हा परिषद शाळेतर्फे विद्यार्थ्यांना वही, पेन, मास्कचेही वाटप करण्यात आले. या वेळी सर्व ग्राम पंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोहनदादा आवासे, डॉ.हर्षल पाटील, योगेश ठाकरे, पृथ्वीराज उखळदे, गंगाराम ठाकरे, प्रकाश पवार, पोलीस पाटील भरत शिंदे , डॉ.विनोद पाटील, संगीता ठाकरे,शिलूताई पाडवी हे उपस्थित होते जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक दत्तात्रय अहिरे, रत्नकांत भोईटे, पवित्रा देवरे,भरत पाडवी, वसावे, मुसळ, ठाकरे अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनिस हे मान्यवर उपस्थित होते. मुलांना इंग्रजी बोलण्याबद्दल कराडीपाथचे क्षेत्रसमन्वयक अतिक शेख यांनी ही या बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रत्नकांत भोईटे यांनी केले.
पाहा व्हिडीओ: