Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“आता प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव!”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

February 28, 2021
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
pustak gav

मुक्तपीठ टीम

 

 मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा. मराठी भाषेचा जागर व्हावा यासाठी पुस्तकाचं गाव उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये राज्यात एकच पुस्तकाचं गाव का असावे? असे नमूद करून तळा गाळातील मराठी भाषा, तिच्या वैशिष्ट्यांसह सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न करतो. मग मराठी भाषेचा विकास तिथपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले जातील. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक पुस्तकाचे गाव असायला हवे. त्यासाठी पुढील मराठी भाषा गौरव दिनापूर्वी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक गाव पुस्तकांचे गाव असेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी  केली. मराठी भाषा दिनानिमित्ताने मराठी भाषा विभागाचे विविध पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

marathi bhasha din awards -1 (1)

            यावेळी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे यांच्यासह पुरस्कार प्राप्त मान्यवर उपस्थित होते.

            विजेत्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आज मान्यवरांना देण्यात येणारा हा केवळ पुरस्कार नसून मराठी भाषेची सेवा केल्याबद्दल आणि अक्षरधनाची जपणूक केल्याबद्दल ऋण व्यक्त केले जात आहेत. साहित्यिक केवळ लेखन करत नाहीत. तर ते आयुष्याची गाडी रुळावर ठेवतात असता उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेना प्रमुख म्हणत, एका एका अक्षरातून शब्द बनतो. मग त्या शब्दांचे मंत्रही होतात, ओव्याही होतात आणि शिव्याही होतात. ज्याच्या-त्याच्यावर भाषेचे कोणते संस्कार होतात, त्यातून त्याची भाषा विकसित होत असते. भाषा जपणे म्हणजे संस्कृतीचे जतन करणे आहे, असेही ते म्हणाले.

marathi bhasha din awards -1 (2)

परदेशातील मराठी मंडळातही मराठी भाषेचे, मातृ भूमीचे प्रेम आणि ओढ असल्याचे जाणवते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या उक्तीप्रमाणे ही मंडळी मराठी भाषेवरील आपले प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी कार्यक्रम, उपक्रमांचेही आयोजन केले जाते. मुख्यमंत्र्यांनी फिलाडेल्फीया येथील अशाच एका कार्यक्रमास उपस्थित राहिल्याची आठवण यावेळी सांगितली.

मुख्यमंत्र्यांचे वाचन, साहित्य प्रेम

marathi bhasha din awards -1 (3)

भाषणात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ओघवत्या शैलीत आपण वेळ मिळेल, त्यावेळी काही-ना-काही वाचत असतो असे नमूद करतानाच पु.ल. देशपांडे यांचे इंग्रजीतून मराठीत भाषांतरीत शब्दांची विसंगती, कवीवर्य वि.दा. करंदीकर यांच्या कविता शालेय जीवनात तोंडपाठ असल्याच्या आठवणी, कवी मंगेश पाडगांवकर यांच्याशी झालेला संवाद, कवी वा.रा. कांत यांची रुग्णालयातील भेट, कवयित्री शांता शेळके यांच्या म्हणी, ओव्या, लोकगीतांविषयीचे साहित्य, बहिणा बाईंची गाणी यांचाही आवर्जून उल्लेख केला. याबरोबरच प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या भाषणाच्या सीडीज यांच्यासह अनेक पुस्तकांचा, विविध साहित्यकृतींच्या सीडीज यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला अमुल्य ठेवा दिल्याचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला.

शासकीय भाषा सोपी करणार – सुभाष देसाई

marathi bhasha din awards -1 (4)

            शासकीय वापरातील मराठी शब्दांना सोपे पर्यायी शब्द शोधून त्यांना वापरात आणण्यात येतील असे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.  जगभरातील मराठी कुटुंबांना एकत्रित जोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंच तयार करण्यात येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय भाषा संवर्धन केंद्रांचे जाळे तयार करण्यात येत असल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले.

            यावेळी मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्थेच्यावतीने अनेक उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

            राज्य मराठी विकास संस्था आणि पुणे येथील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण : प्रतिमांकन आणि आलेखन’ ह्या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रभर मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण तसंच प्रतिमांकन (डिजिटायझेशन) आणि त्यातील व्याकरणिक विशेषांचे नकाशांच्या स्वरूपात आलेखन (मॅपिंग) करण्यात येत आहे.

ऐरोली येथे होणार मराठी भाषा उपकेंद्र

            मराठी भाषा विभागाने ऐरोली (नवी मुंबई) येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तांत्रिक सहकार्याने मराठी भाषा उपकेंद्र उभारण्याचे निश्चित केले आहे. मराठी भाषा विभागाच्या अधीनस्थ विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या कामात समन्वय राहावा यासाठी यापैकी काही कार्यालये एकाच इमारतीत असावीत हा यामागील उद्देश आहे.

            या उपकेंद्रामध्ये ॲम्पिथिएटर, बालोद्यान, आनंदयात्रा, उपाहारगृह, ग्रंथालय, प्रदर्शनकक्ष, परीक्षाकेंद्र, वातानुकूलित प्रेक्षागृह असणार आहे.

 

‘पुस्तकांचे गाव योजने’चा होणार विस्तार: अक्षरयात्रा”

Bhilar village of books -1

            पस्तीस दालनांमध्ये विविध साहित्यप्रकारांची सुमारे पस्तीस हजार पुस्तके असणारे भिलार हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव. राज्य मराठी विकास संस्थेकडून ही योजना ‘पुस्तकांचं गाव विस्तार योजना : अक्षरयात्रा’ या नावाने विस्तारण्यात येत आहे.

‘पुस्तकांचं गाव विस्तार योजना : अक्षरयात्रा’ – समाविष्ट ठिकाणे:

  • कोकण विभाग : थिबा पॅलेस, रत्नागिरी येथील प्रादेशिक संग्रहालय
  • पुणे विभाग : ग्रामपंचायत अंकलखोप, जिल्हा सांगली येथील कृष्णाकाठचा श्री दत्तमंदिराचा परिसर औदुंबर.
  • नाशिक विभाग : निफाड तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपळगाव (बसवंत)
  • अमरावती विभाग : वर्णमुद्रा प्रकाशन शेगाव, बुलढाणा

 

वऱ्हाडी बोलींच्या शब्दकोशांचे प्रकाशन

            वऱ्हाडी बोलीच्या शब्दकोशाचे दोन खंड आणि वऱ्हाडी वाक्प्रचार आणि म्हणी यांचे प्रत्येकी एक खंड असे एकूण चार खंड डॉ. विठ्ठल वाघ आणि डॉ. रावसाहेब काळे यांच्याकडून तयार करण्यात आले असून ते राज्य मराठी विकास संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात येत आहेत. हे खंड मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाजालावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

साहित्य संस्कृती मंडळाच्या पुस्तकांचे प्रकाशन

            महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाद्वारे वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तकं दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची परंपरा आहे. कोविड-१९सारख्या महासंकटात देखील ही परंपरा खंडित न होऊ देता अत्यंत मौलिक अशा १५ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

 

मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार स्पर्धा

            मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषाविभागाद्वारे आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना करण्यात येत आहे. या मंचातर्फे सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून चलचित्र, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा कालावधी दि. १० मार्च ते दि. १० एप्रिल २०२१ असा असून या स्पर्धेचा निकाल महाराष्ट्र दिनी १ मे २०२१ रोजी जाहीर करण्यात येईल.


Tags: cm uddhav thackeraydr. vishwajeet kadamsubhash desaiपुस्तकाचं गावस्वातंत्र्यवीर सावरकर
Previous Post

बाळात लठ्ठपणा नको असेल तर गर्भवतींनी काय करावं?

Next Post

ऊर्जामंत्री नितीन राऊतांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील कवितांचे अभिवाचन

Next Post
nitin raut

ऊर्जामंत्री नितीन राऊतांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील कवितांचे अभिवाचन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!