Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

माध्यम महोत्सव: सृजनशीलतेला बहर, माध्यमांचा इतिहास, ग्लॅमरची साथ!

April 21, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
BMM

रोहिणी ठोंबरे / मुक्तपीठ टीम

विलेपार्लेतील साठ्ये महाविद्यालयाचा माध्यम महोत्सव जोमात आणि जल्लोषात पार पडला. कोरोना काळानंतर २ वर्षाने तरूणाईचा उत्साह अगदी उफाळला होता. विशेष म्हणजे माध्यम महोत्सवात सृजनशीलतेला बहर आल्याचं दिसलं. कॉलेजमधील तरुणाईनं महोत्सवाची थीम असणारा माध्यमांचा इतिहास मांडला. हा इतिहास, तरुणाईचं कला सादरीकरण यासोबत ग्लॅमरची साथ असल्यानं माध्यम महोत्सव मस्त साजरा झाला.

 

माध्यमांची ७५ वर्षे!

काही दिवसांपूर्वी या महोत्सवासाठी थिम ठरवण्यात आली. ही थिम होती स्वातंत्र्यानंतरची माध्यमांची ७५ वर्षे. ती ठरल्यानंतर त्याची सगळी तयारी सुरू झाली. विद्यार्थ्यांनी वेगवेगळे गट पाडत महोत्सवाची कामे विभागून घेतली. गट वेगवेगळे होते, परंतु, विद्यार्थ्यांची एकीही तितकीच पक्की होती.

माध्यमांचा इतिहास मांडण्यासाठी विद्यार्थ्यांनी रात्र की दिवस ते पाहिलं नाही आणि अफाट मेहनत घेतली. याचा परिणाम या दोन दिवसाच्या उत्सवात सर्वांना दिसलाच.

 

विद्यार्थ्यांना प्राध्यापकांची साथ…

हे सर्व होण्यासाठी साठ्ये महाविद्यालयाचेही तितकेच मोठे श्रेय आहे. माध्यम महोत्सव हा गेल्या १० वर्षे साजरा केला जात आहे. आजी-माजी विद्यार्थी येथे आवर्जून उपस्थित राहतात. माध्यम विभागाचे प्रमुख गजेंद्र देवडा हे मुलांना विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन करतात. दोन वर्षानंतर विद्यार्थी एकमेकांना भेटले माध्यम महोत्सव होणार आहे ही बातमी ऐकून उत्साहीत झाले.

 

माध्यमांचा इतिहासासोबत चहा, कॉफी आणि चिल…

ध्यमांची ७५ वर्षे या संकल्पनेत विद्यार्थ्यांनी प्रदर्शने, स्पर्धा आयोजित केल्या. प्रदर्शनांमध्ये वेगवेगळी माहिती, माध्यमांचा इतिहास, जुने चित्रपट आणि जुन्या मालिकांची माहिती यासह स्टॉल्स मांडले होते. स्टॉल्समध्ये मामाचा चहा, कॉफी आणि चिल हे या उत्सवाचे आकर्षण होते.

 

महोत्सवात ग्लॅमरही अवतरलं…

माध्यम महोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्लॅमरची साथ दिसली. नामवंत अभिनेते चिन्मय मांडलेकर यांचा लवकरच शेरशिवराज हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चिन्मय आणि शेरशिवराज चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी माध्यम महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रमुख उपस्थिती दर्शवली. त्यांनी मुलांचे कार्यक्रमानिमित्त खूप कौतुक केले. तर, दुसऱ्यादिवशी अभिनेत्री आदिती सारंगधर हीने प्रमुख उपस्थिती दर्शवली. तिनेही मुलांचे कौतुक केले. शिक्षकांसह गप्पा मारत स्पर्धांचा आनंद लूटत धम्माल केली. त्याचदिवशी दुपारी गायक मंगेश बोरगावकर आणि अभिनेता आशूतोष कुलकर्णी या दोघांनीही एकत्र हजेरी लावली. विद्यार्थ्यांच्या आणि या सर्वांच्या उपस्थितीत हा माध्यमांचा उत्सव अर्थात माध्यम महोत्सव जबरदस्त पार पडला.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: BMMMadhyam MahotsavSathaye Collegeबीएमएममाध्यम महोत्सवसाठ्ये कॉलेज
Previous Post

मनसेला राष्ट्रवादीचे बुस्टर डोस!! पाहा व्हिडीओ:

Next Post

मिठी नदी प्रदूषण मुक्तीच्या उपाययोजनांचा आदित्य ठाकरेंकडून आढावा

Next Post
Aditya Thackeray reviews Mithi river pollution mitigation measures

मिठी नदी प्रदूषण मुक्तीच्या उपाययोजनांचा आदित्य ठाकरेंकडून आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!