Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विजय दिन: १६ डिसेंबरला पुण्यासह १५ शहरांमध्ये लष्कराकडून विजय दौड

December 1, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Indian Army

मुक्तपीठ टीम

पाकिस्तानवर १९७१च्या युद्धात मिळवलेला ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाने १६ डिसेंबर २०२२ या विजय दिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवशी सदर्न स्टार विजय दौड -२२ ही धावस्पर्धी आयोजित केली आहे. दक्षिण कमांडच्या अखत्यारीत येणाऱ्या पुणे तसंच इतर पंधरा प्रमुख शहरांमध्ये या धावस्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला जाईल. ‘सैनिकांसाठी धावा – सैनिकांबरोबर धावा” या संकल्पनेवर आधारित असलेले हे भव्य आयोजन भारतीय लष्कर आणि जनता, खास करून युवावर्ग यांच्यामधील धागा दृढ करण्यासाठी आहे. शहीदांना आदरांजली वाहण्यासोबतच विजय दौड-२२ मधील सहभागी आपल्या देशातील धैर्य, क्षमता आणि उत्साहाचे दर्शन घडवतील. देशसेवेसाठी सर्वोच्च त्याग केलेल्या शूर सैनिकांना आदरांजली देण्यासाठी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एकाच वेळी विविध ठिकाणी म्हणजेच पुणे, सिकंदराबाद, चेन्नई, बंगळुरू, जोधपुर, जैसलमेर आणि इतर मुख्य शहरांमध्ये एकाच वेळी होत असलेल्या या कार्यक्रमाला समाजातील सर्व  स्तरातील जनतेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण आहे. या समारंभात शहिदांना पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर सर्व निवडक ठिकाणी विजय दौड-२२ ला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं जाईल.

पुणे येथे १६ डिसेंबर २०२२ रोजी विजय दौड २२ ला आरंभ होईल.  दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल ए.के. सिंग (अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक) हे सकाळी सात वाजता दक्षिण कमांड युद्ध स्मृती स्थळी पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम करतील. त्यानंतर विजय दौड २०२२ ला पुणे येथे हिरवा झेंडा दाखवून रवाना केले जाईल. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांनी यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे. राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट आणि इतर सर्व लोकांनी विजय दौड २०२२ मध्ये सहभागी होऊन विजय दिन २०२२ च्या विजय सोहळ्याचा भाग व्हावे असे आवाहन लष्कराने केले आहे.

विजय दौड- २२ ही ३ श्रेणीमध्ये घेतली जाणार आहे, त्यापैकी पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळी १२.५ किलोमीटर दौड असेल तर शालेय विद्यार्थ्यांसाठी 5 किलोमीटरची दौंड आणि फक्त महिलांसाठी असलेली ४ किलोमीटरचे दौड अशा तीन श्रेणीमध्ये विजय दौड २२चे आयोजन केले आहे. १२.५ किलोमीटरच्या श्रेणीसाठी एकूण ५० हजार रुपये तर शालेय विद्यार्थी तसेच महिलांसाठी असलेल्या श्रेणीसाठी प्रत्येकी २२ हजार रुपये अशी बक्षिसांची रक्कम असेल.

पुणे येथे होणाऱ्या दौड मध्ये भाग घेण्यासाठी विनामूल्य ऑनलाईन नोंदणी www.runbuddies.club   या संकेतस्थळावर करता येईल. नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १० डिसेंबर २०२२ आहे. सदर्न स्टार विजय दौड-२२ मध्ये सर्व नागरिकांचा मनापासून आणि उत्साहाने घेतलेला सहभाग हा त्यांचा देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्र उभारणीप्रती बांधिलकी यांचे दर्शन घडवून जाईल.


Tags: Army Southern Command Headquartersgood newsIndian ArmyMaharashtramuktpeethpuneVictory DayVijay Daud-22घडलं-बिघडलंचांगली बातमीपुणेभारतीय लष्करमहाराष्ट्रमुक्तपीठलष्कर दक्षिण कमांड मुख्यालयविजय दिनविजय दौड-२२
Previous Post

भाजपा नेते पुन्हा पुन्हा शिवाजी महाराजांवरून वाद का माजवतात?

Next Post

श्रुतींच्या आंदोलनाने अन रागाविष्काराने रंगले ‘ख्याल विमर्श’चे दुसरे सत्र

Next Post
pt. satyasheel deshpande performing

श्रुतींच्या आंदोलनाने अन रागाविष्काराने रंगले ‘ख्याल विमर्श’चे दुसरे सत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!