मुक्तपीठ टीम
क्षेत्रांमधील आघाडीच्या कंपन्यांसोबत भागीदारीमार्फत डिजिटल युजर्सना अनोख्या, विशेष सेवा उपलब्ध करवून देण्याच्या आपल्या धोरणाला अनुसरून ‘वी’ ने हंगामा म्युझिकसोबत भागीदारी करत वी ऍपवर म्युझिक सेवा सुरु केली आहे. हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलून ‘वी’ने आपल्या ओटीटीवर आधारित डिजिटल कन्टेन्ट सेवा-सुविधा अधिक मजबूत केल्या आहेत, ज्यामध्ये मनोरंजन, आरोग्य आणि फिटनेस, शिक्षण, कौशल्य विकास यांचा समावेश असून व आपल्या या पोर्टफोलिओमध्ये ‘वी’ सातत्याने वाढ करत आहे. ‘वी’च्या म्युझिक सेवेचा शुभारंभ प्रसिद्ध संगीतकार सलीम सुलेमान यांनी केला आणि यावेळी त्यांनी गाणे देखील सादर केले.
या भागीदारीअंतर्गत ‘वी‘च्या सर्व पोस्टपेड आणि प्री-पेड ग्राहकांना हंगामा म्युझिकची ६ महिन्यांची सब्स्क्रिप्शन कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता दिली जाणार आहे. यामध्ये ग्राहक हंगामाच्या लाखो गाण्यांच्या प्रचंड मोठ्या लायब्ररीमधून २० वेगवेगळ्या भाषांमधील, वेगवेगळ्या शैलीतील संगीताचा आनंद जाहिरातींचा अजिबात व्यत्यय न येता घेता येईल. त्याबरोबरीनेच हवी तितकी गाणी डाउनलोड करता येतील, संगीत व्हिडिओ स्ट्रीम करता येतील, बॉलिवूडमधील ताज्या घडामोडी जाणून घेता येतील, गाणी ऐकत असताना कॉलर ट्यून्स सेट करता येतील, तसेच पॉडकास्ट देखील ऐकता येतील.
आपल्या मनोरंजन सेवांमध्ये वाढ करत, ग्राहकांना ख्यातनाम कलाकारांच्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट्सचा आनंद घेण्याची संधी देखील वी देत आहे. वी ग्राहक वी ऍपवर नाममात्र शुल्क भरून ५२ लाईव्ह डिजिटल कॉन्सर्ट्स ऐकू शकतील. ‘वी’चे सीएमओ श्री. अवनीश खोसला यांनी यावेळी सांगितले, “मनोरंजन, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक सेवा क्षेत्रातील अनुभव व नैपुण्य असलेल्या ब्रँड्ससोबत भागीदारी करून आपल्या ग्राहकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी ‘वी’ सातत्याने प्रयत्नशील आहे. आपल्या ग्राहकांच्या विविध गरजा आणि आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी अनोख्या व आकर्षक डिजिटल सेवासुविधा पुरवण्यासाठी विविध क्षेत्रातील ग्राहकांच्या सहयोगाने काम करण्यासाठी ‘वी’ वचनबद्ध आहे. आमचे हे धोरण सातत्याने विकसित आणि यशस्वी होत असल्याने येत्या भविष्यकाळात आम्ही अनेक नवीन उपक्रम घेऊन येत राहू.”
हंगामा म्युझिकसोबत आमच्या भागीदारीची घोषणा करताना मला अतिशय आनंद होत आहे, या भागीदारीमुळे आमच्या ग्राहकांची सर्वसमावेशक संगीत स्ट्रीमिंग सेवा मिळवण्याची गरज पूर्ण होणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ञांसोबत भागीदारी करून ग्राहकांना श्रेणीतील सर्वोत्तम सेवांचा लाभ मिळवून देऊन कायम आघाडीवर राहण्यात मदत करण्याच्या आमच्या धोरणाला अनुसरून ही भागीदारी करण्यात आली आहे. हंगामासोबतच्या या भागीदारीमुळे वी युजर्सना वेगवेगळ्या शैलीतील आणि आपल्या आवडीच्या भाषेतील विविध, हव्या तितक्या गाण्यांचा आनंद घेता येणार आहे.”
हंगामा डिजिटल मीडियाचे संस्थापक नीरज रॉय यांनी सांगितले,”वीच्या २५० मिलियनपेक्षा जास्त ग्राहकांच्या सांगीतिक प्रवासात सहभागी होताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. वी सोबत आमच्या सहयोगातून आम्ही या वर्षाच्या सुरुवातीला भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या प्रीमियम व्हिडिओ ऑन डिमांड (पीव्हीओडी) बाजारपेठेत पे पर व्ह्यू हे अशाप्रकारचे पहिले सर्व्हिस मॉडेल सादर केले. जगभरातील दर्शकांचे मनोरंजन करण्यासाठी, त्यांना कायम आपल्यासोबत जोडून ठेवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधून ते वाढवण्याचे हंगामाचे उद्धिष्ट असून त्याला अनुसरून ही भागीदारी करण्यात आली आहे. ऑडियो, व्हिडिओ आणि गेमिंगमध्ये वेगवेगळ्या शैलीतील, वेगवेगळ्या भाषांमधील वैविध्यपूर्ण आणि समृद्ध संगीत समाविष्ट करण्यासाठी आम्ही सातत्याने विस्तार करत आहोत.”