मुक्तपीठ टीम
ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी ऑगस्ट महिना फायद्याचा ठरला आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमधील विक्री जवळजवळ सर्व कंपन्यांसाठी चांगली आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाला वार्षिक आधारावर पाच टक्क्यांची वाढ मिळाली आहे. तर ह्युंडाईची वार्षिक वाढ १२.३% आहे. गेल्या महिन्यात टाटा मोटर्सने एकूण विक्रीत ५८.९% ची वार्षिक वाढ नोंदवली होती. गेल्या महिन्यात ५७,९९५ युनिट्सची विक्री केली. अशोक लेलँडची वार्षिक वाढ ४८% झाली आहे, तर ९,३६० युनिट्सची विक्री झाली आहे.
वाहन कंपन्यासाठी ऑगस्ट महिना फायद्याचा…
- देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने गेल्या महिन्यात एकूण १.३० लाख वाहने विकली.
- ह्युंडाईसाठी ऑगस्ट महिनाही चांगला गेला आहे. कंपनीत वर्षानुवर्ष १२.३% ची वाढ झाली.
- गेल्या महिन्यात कंपनीने ५९,०६८ युनिट्सची विक्री केली.
- गेल्या महिन्यात टाटा मोटर्सने एकूण विक्रीत ५८.९% ची वार्षिक वाढ नोंदवली होती. गेल्या महिन्यात ५७,९९५ युनिट्सची विक्री केली.
- अशोक लेलँडची वार्षिक वाढ ४८% झाली आहे, तर ९,३६० युनिट्सची विक्री झाली आहे.