मुक्तपीठ टीम
वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद भारत व वीर भगतसिंह उत्सव समिती चांदूरबाजार यांच्या विद्यमाने दिला जाणारा वीर भगतसिंह स्मृती सन्मान यावर्षी गेली अनेक वर्ष सामाजिक चळवळीत सक्रिय असणारे जेष्ठ पत्रकार राजाभाऊ देशमुख गानोजेकर यांना देण्यात आला. दरवर्षी हा उत्सव मोठ्या स्तरावर साजरा केला जातो. परंतु यावर्षीची शेती व शेतकरी यांची परिस्थिती बघता हा उत्सव मोठ्या प्रमाणात न करता अगदी छोट्या स्वरूपात संपन्न करण्यात आला. हे या सन्मानाचे चवथे वर्ष होते.
राजाभाऊ देशमुख हे गेली अनेक वर्ष सामाजिक चळवळीत कार्यरत असून परिवर्तन वादी चळवळीचे ते ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. त्यांच्या सामाजिक व पत्रकारिता चळवळीतील योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शेतकरी विचारवंत कॉ. पंकज आवारे यांच्या हस्ते त्यांना शाल, सन्मानचिन्ह व ग्रामगीता देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी या समिती चे संयोजक तथा वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ तुषार देशमुख, अनिस चे संघटक ज्ञानेश्वर डवरे, कोंडे वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद चे जिल्हा कार्याध्यक्ष रिद्धेश ठाकरे, उपाध्यक्ष मृत्युंजय आवारे, सुदर्शन पिसे, संभाजी ब्रिगेड चे प्रतिक काटोलकर उपस्थित होते.