मुक्तपीठ टीम
श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची मंगळवारी पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी समाधी स्थळाच्या परिसराची पाहणी केली. नानासाहेब पेशवे यांचा समाधीस्थळ दुर्लक्षित असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याबाबत ट्विटरवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
थोडा वेळ लागेलही पण नक्की वाचा ~
श्रीमंत नानासाहेब पेशवे आम्हाला माफ करा. उद्या २९ ला तुमची पुण्यतिथी आहे. तुम्ही या पुण्यात १४ बागा ३ मोठी तळी अनेक बाजारपेठा वसवल्या. शनिवारवाडा बांधला, पर्वती उभारली, सोमेश्वर मंदिर, बनेश्वर मंदिर, विठ्ठलवाडी मंदिर जीर्णोद्धार,
१/४ pic.twitter.com/ZHJqwF0aqI— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) June 28, 2021
मनसे नेते वसंत मोरे यांनी उघड केलेले धक्कादायक वास्तव त्यांच्याच शब्दात:
थोडा वेळ लागेलही पण नक्की वाचा ~
श्रीमंत नानासाहेब पेशवे आम्हाला माफ करा. उद्या २९ ला तुमची पुण्यतिथी आहे. तुम्ही या पुण्यात १४ बागा ३ मोठी तळी अनेक बाजारपेठा वसवल्या. शनिवारवाडा बांधला, पर्वती उभारली, सोमेश्वर मंदिर, बनेश्वर मंदिर, विठ्ठलवाडी मंदिर जीर्णोद्धार, कात्रज पाणी पुरवठा योजना, म्हणजे जवळजवळ तुम्ही पुण्याचे मालकच होता पण आज याच पुण्यात भाजपाची सत्ता आली आणि त्यांनी कधी नव्हे तो जल्लोष शनिवारवाड्यावर केला. कदाचित तुम्हीही सुखावला असाल, मनोमन वाटले असेल आता मी निर्माण केलेल्या सर्व पाऊलखुणांना ही लोक आता त्यांना उजाळा देतील, पण झालंय उलटं!
उद्या पुण्यतिथी म्हणून मी मुद्दाम काल पूना हॉस्पिटल समोरच्या नदीपात्रातील तुमच्या समाधी स्थळाला भेट दिली तर हे विदारक दृश्य समोर आले. लोकप्रतिनिधी म्हणून मान शरमेने खाली गेली आणि आठवले की या प्रभागाचे भाजपाचे ३ नगरसेवक (एक दिवंगत)! तकी वाईट अवस्था या सुसंस्कृत पुण्यात पुण्याच्या श्रीमंतांची होत असेल तर त्या सर्व लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध.