मुक्तपीठ टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याच्या आदेशावरून नाराज मनसे नेते वसंत मोरे यांना पुणे शहराध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यातील प्रमुख नेत्यांना आज मुंबईत बोलावलं होतं. वसंत मोरे यांना मात्र मुंबईला बोलावण्यात आले नव्हते. अखेर वसंत मोरे यांना पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन हटवले असून राज ठाकरेंनी पत्र काढत साईनाथ बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपही केला होता लेफ्ट!
- याआधी वसंत मोरेंनी पुण्यातील उपविभाग प्रमुख आणि उपशहर प्रमुखांचा व्हॉट्सअॅप ग्रुपही सोडला होता.
- पक्षसंघटनासाठी बनवलेल्या ग्रुपवर कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले होते.
- अखेर चर्चा टाळण्यासाठी वसंत मोरेंनी ग्रुप सोडणं पसंत केलं होतं.
- एका उपविभाग प्रमुखाच्या पोस्टवरुन ग्रुपमध्ये चर्चा झाली होती.
- त्यानंतर मोरेंनी ग्रुप सोडला आणि सिंहासनावर बसलेला फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला शेअर केला होता.
राज ठाकरेंनी पुण्यातील मनसे नेत्यांना मुंबईत बोलावले!
- पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र आहे.
- राज ठाकरे यांनी पुण्यातील प्रमुख नेत्यांना आज मुंबईत बोलावलं होतं.
- वसंत मोरे यांना मात्र मुंबईला बोलावण्यात आलं नव्हतं.
- मात्र पुण्यातील नाराजीसंदर्भात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्याची शक्यता आहे.
- व त्यानंतर वसंत मोरेंना शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आले.
सरचिटणीसपदावर कायम!
वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले असले तरी ते आजही मनसेचे सरचिटणीस आहेत. त्यापदाबद्दल काही बदल करण्यात आलेला नाही.