मुक्तपीठ टीम
भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेना ही तरुणांची सर्वात मोठी संघटना आहे. या राष्ट्रीय छात्र सेनेच्या अधिकारी कँप्टन मालिनी शर्मा यांना ‘रक्षा राज्य मंत्री प्रशंसा’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. या बद्दल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
“एन. सी. सी म्हणजे एकता आणि अनुशासन. यामुळेच आज स्वयंम शिस्त व राष्ट्रिय एकात्मतेसाठी विद्यार्थिंनींनी जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रीय छात्र सेनेत सहभागी व्हायला हवे”, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. भारत सरकार संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत एन. सी. सी. अधिकारऱ्यांसाठी अत्यंत मानाचा व प्रतिष्ठित पुरस्कार अंधेरी येथील भवन्स काँलेजच्या आर्मी एन. सी. सी. अधिकारी मालीनी शर्मा यांना प्राप्त झाला. गेली सोळा वर्षे कँप्टन मालीनी शर्मा अनेक विद्यार्थिंनींना एन. सी. सी. चे प्रशिक्षण देत आहेत. देशासाठी तरुणपिढीला सक्षम बनवण्याचे काम कॅप्टन मालीनी शर्मा करत आहेत त्यांच्या शैक्षणिक व एन. सी. सी. कार्याचे योगदान पाहूनच त्यांना ‘रक्षा राज्य मंत्री प्रशंसा’ पुरस्कार संरक्षण विभागाने बहाल केले आहे.
पुरस्कार प्राप्त झाल्यावर कँप्टन मालीनी शर्मा यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या कार्याची माहिती दिली. तसेच देशातील सैन्य दलात देशसेवेसाठी तरुण पिढीला घडवणार्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या कार्याचे कौतुक शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.