मुक्तपीठ टीम
कोरोना लसीकरणातील एक मोठा अडथळा म्हणजे काही अपप्रवृत्तींनी पसरवलेल्या वेगवेगळ्या अफवा. त्यातील एक अफवा म्हणजे, कोरोना लसीकरणामुळे लैंगिक क्षमतेवर परिणाम होत असल्याची आहे. मात्र, त्या अफवेत काडीमात्र तथ्य नसल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ मांडतात.
कोरोना प्रतिबंधक लसीमुळे लैंगिक क्षमेतवर दुष्परिणाम होत असल्याचेही कोणतेही पुरावे नाहीत, उलट त्यामुळे कोरोनाशी लढण्याची क्षमता वाढते. कोरोना झालाच नाही तर कोरोना झाल्यानंतर शरीरावर होऊ शकणारे गंभीर दुष्परिणामापासूनही आपोआपच सुटका होते. त्यामुळे कोरोनापश्चात काहींमध्ये उद्भवणाऱ्या लिंग शैथिलतेसारख्या समस्याही भेडसावू शकत नाहीत.
कोरोना लसीकरण आणि लैंगिक क्षमता यांचा काही संबंध आहे का?
- आजवर लसीच्या कोणत्याही शारीरिक दुष्परिणामाचे असे कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही.
- कोरोना लसीमुळे लैंगिक क्षमतेवर दुष्परिणाम होतो, ही अफवाच.
- अफवांमुळे पुरुष लस घेणं टाळत आहेत.
- लस कोरोनाच्या गंभीर लक्षणांचा धोका कमी करते.
- त्याचा त्यांना फायदा होईल, त्यांचे नुकसान होणार नाही.