मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रासह भारतातील लसीकरण रोज नवनवे विक्रम करत आहे. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मोठा वाटा आहे तो एनआरएचएम कर्मचाऱ्यांचा. कसलीही रोजगार शाश्वती नसलेले हे हे कर्मचारी रात्रीही लसीकरण करत आहेत.
गुरुवारी सकाळी सातच्या आकडेवारीनुसार भारतातील लसीकरणाचा आकडा ९६ कोटी ८२ लाख २० हजार ९९७वर पोहचला झाला आहे. देशातील वाढते विक्रमी लसीकरण हे जगभरात कौतुकाचा विषय ठरले आहे. त्यात आपला महाराष्ट्रही मागे नाही. लसीकरणाचे ध्येय साध्य करण्यासाठी सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना म्हणजेच एनआरएचएम कर्मचारी रात्रीचा दिवस करत आहेत.
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील उद्गिर तालुक्याच्या हेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत लोहारा येथे असेच अहोरात्र लसीकरण सुरु आहे. तिथे काम करणाऱ्या एनआरएचएम कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ९ वाजता दिवस सुरु होतो. कर्मचारी दिवसा-रात्री दोन पाळ्यांमध्ये काम करतात. प्रत्येकाचे काम किमान १०-११ तास ते १४ तासांपर्यंत सुरुच असते.
महाराष्ट्रभरात एनएचआरएम २२ हजार कर्मचारी आहेत. हे कर्मचारी किमान १२ वर्षांपासून काम करत आहेत. पण ते कायमस्वरुपी नसून कंत्राटी आहेत. त्यामुळे नियमित कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या रजा, महागाई भत्ता वगैरे काहीही मिळत नाही. एनआरएचएम कर्मचाऱ्यांना मासिक १७ हजार मानधन दिले जाते. तर तेच काम करणारे सरकारी कर्मचारी त्याच कामासाठी ४० हजार रुपये वेतन आणि इतर सोयीसुविधांचा लाभ मिळवतात. या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी समान काम, समान वेतन असा नियमही धाब्यावर बसवला जातो. आता न्यायालयाच्या आदेशानंतर तरी हा भेदभाव संपेल अशी अपेक्षा आहे.
त्यांच्या समस्येला आपलेपणाने समजवून घेण्यासाठी त्यांनी आपल्यासाठी लसीकरणात सरकारी कर्मचाऱ्यांच्या जोडीने बजावलेली कामगिरी लक्षात घेणे आवश्यक आहे.
भारताची लसीकरणातील कामगिरी:
सकाळी सात वाजताच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, लसीकरणाची वर्गवारीनुसार आकडेवारी पुढीलप्रमाणे :
HCWs | 1st Dose | 1,03,75,639 |
2nd Dose | 90,58,495 | |
FLWs |
1st Dose | 1,83,60,413 |
2nd Dose | 1,54,56,207 | |
Age Group 18-44 years |
1st Dose | 39,01,04,011 |
2nd Dose | 10,70,45,167 | |
Age Group 45-59 years |
1st Dose | 16,69,84,547 |
2nd Dose | 8,49,05,479 | |
Over 60 years |
1st Dose | 10,53,36,375 |
2nd Dose | 6,05,94,664 | |
Total | 96,82,20,997 |
गेल्या २४ तासांत, १९,८०८ रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३,३३,६२,७०९ इतकी झाली आहे. पर्यायाने, सध्या भारतात रुग्ण बरे होण्याचा दर, ९८.०७% इतका झाला आहे. हा दर मार्च २०२० पासूनचा सर्वोच्च दर आहे.
केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, गेल्या सलग १०९ दिवसांपासून, रुग्ण बरे होण्याचा दर, ५०,००० पेक्षा कमी असल्याचे प्रमाण कायम राहिले आहे.
गेल्या २४ तासांत १८,९८७ नवे रुग्ण आढळले आहेत.
सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २,०६,५८६ इतकी असून, गेल्या २१५ दिवसातली ही सर्वात कमी लोकसंख्या आहे. सध्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत, उपचाराधीन रूग्णांचे प्रमाण, ०.६१% इतके आहे.
देशभरात, कोरोना चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत, १३,०१,०८३ चाचण्या करण्यात आले. भारतात आतापर्यंत एकूण, ५८.७६ कोटींपेक्षा अधिक (५८,७६,६४,५२५) चाचण्या झाल्या आहेत.
देशभरात चाचण्यांची संख्या वाढवली जात असतांनाच, साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर देखील, सलग १११ दिवस, ३% पेक्षा कमी म्हणजे १.४४% इतका आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर देखील सलग ४५ दिवस ३% पेक्षा कमी राहिलेला आहे. आणि सलग १२८ दिवस ५% पेक्षा कमी राहिला आहे.