मुक्तपीठ टीम
मुंबईतील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठात वरिष्ठ वैज्ञानिक (पशुवैद्यकीय विज्ञान), वैज्ञानिक (पशुवैद्यकीय विज्ञान) या पदांसाठी २ जागांची भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ जुलै २०२१ पर्यंत मुलाखत देऊ शकतात. ही भरती मुलाखत स्वरूपात असणार आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) वरिष्ठ वैज्ञानिक (पशुवैद्यकीय विज्ञान)- पशुधन उत्पादन तंत्रज्ञान/ पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य/ मांस विज्ञान आणि तंत्रज्ञान/ अन्न स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य या विषयात ८ वर्षांचा अनुभव असलेल्या संबंधित मूलभूत विज्ञानांसह विषयातील डॉक्टरेट पदवी
२) वैज्ञानिक (पशुवैद्यकीय विज्ञान) – मांस तंत्रज्ञान/ पशुधन उत्पादन तंत्रज्ञान/ पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य/ कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी (दुग्ध / मांस / मत्स्य पालन) विभागातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय संबंधित नियमानुसार असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
मुलाखतीचा पत्ता
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई- ४०००१२
अधिक माहितीसाठी
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट http://mafsu.in/ वरून माहिती मिळवू शकता.