मुक्तपीठ टीम
व्ही.एस. पठानिया यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या महासंचालकपदाची सुत्रे स्वीकारली आहेत. ते दलाचे २४ वे प्रमुख आहेत. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे तटरक्षक पदक, शौर्यसाठी पदक आणि भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक प्रशंसेचेही ते मानकरी आहेत.
महासंचालकांना ध्वजाधिका-यांचा मान दिला जातो. वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय, आणि नवी दिल्लीच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजचे ते माजी विद्यार्थी आहेत. महासंचालक हेलिकॉप्टर पायलट आहेत. मद्रास विद्यापीठातून संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यासात त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी अमेरिकेच्या शोध आणि बचाव आणि पोर्ट आॅपरेशन्समध्ये स्पेशलायझेशन केले आहे.
आपल्या ३६ वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीत पठानिया यांनी अनेक महत्त्वाच्या नियुक्त्या भूषवल्या आहेत. त्यापैकी प्रमुख म्हणजे गांधीनगर येथे उत्तर पश्चिम क्षेत्राचे आणि मुंबई येथे पश्चिम विभागाचे प्रमुख (कमांडर) होते. याशिवाय त्यांनी नवी दिल्ली येथे उपमहासंचालक (एचआरडी ), उपमहासंचालक (नीती आणि योजना) या महत्वाच्या पदांची सुत्रे सां•ााळली होती. याव्यतिरिक्त त्यांनी तटरक्षक दलाच्या सर्व श्रेणींच्या नौकांचे अधिकारीपद भूषविले होते. टेहळणी नौका विग्रह , आॅफशोर पेट्रोल व्हेसेल विग्रह आणि अॅडव्हान्स्ड आॅफशोर पेट्रोल नौका सारंग या नौकांचेही कमांडर होते.
नवी दिल्ली येथील तटरक्षक दलाच्या मुख्यालयात ते प्रधान संचालक (एचआरडी), प्रधान संचालक (धोरण आणि योजना), मुख्य कर्मचारी अधिकारी (आॅपरेशन्स) आदी विविध नियुक्त्या भूषवल्या आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी चेन्नई येथील तटरक्षक हवाई स्टेशनचे कमांडिंग अधिकारी, तटरक्षक मुख्यालयातील संचालक (कार्मिक) आणि सहसंचालक (विमान वाहतूक) तसेच चेन्नई येथे ८४८ या स्क्वाड्रनचेही त्यांनी कमांडरपद भूषविले होते.
नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांना अतिरिक्त महासंचालक पदावर बढती देण्यात आली आणि त्यांनी विशाखापट्टणम येथे तटरक्षक दल कमांडर (पश्चिम सीबोर्ड) म्हणून पदभार स्वीकारला. तेथील कारकिर्दीत महत्वाच्या कारवायांमध्ये (आॅपरेशन्स) वाढ झाली. हजारो कोटी रुपयांचे सोने आणि टन ड्रग्ज/अमली पदार्थांचा साठा, प्रदूषण प्रतिसाद आॅपरेशन्स, परदेशी तटरक्षकांसोबत संयुक्त सराव, अँटी पोचिंग आॅपरेशन्स, सामूहिक बचाव कार्ये यांचा समावेश होता. त्यांनी चक्रीवादळ/नैसर्गिक आपत्ती दरम्यान मानवतावादी मदत आणि तटीय सुरक्षाही त्यांच्या कारर्किदीत मजबूत केली.