मुक्तपीठ टीम
तापसी पन्नू त्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जी एकदम परखडपणे आपले मंत मांडते. एखाद्या मुद्द्यावर टिप्पणी करणे असो किंवा ट्रोलर्सना प्रत्युत्तर देणे असो, तापसी मागे नाही. अलीकडेच याचा एक प्रत्यय आला आहे. आगामी ‘रश्मी रॉकेट’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. तापसी चित्रपटात एका खेळाडूची भूमिका साकारत आहे. अॅथलेटिक बॉडीसाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. ते ट्रेलरमध्येही दिसत आहे. मात्र, काही युजर्सने तिला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आणि तिच्या बॉडीची थट्टा करताना काही जणांनी तिला पुरुष तर काहींनी तिला ट्रान्सजेंडर म्हटले आहे. तिनं शांतपणे अशा गलिच्छ ट्रोलर्सना सणसणीत उत्तर दिलं आहे.
तापसी पन्नू का झाली ट्रोल?
- तापसीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात कमेंट केलेल्या लोकांचे स्क्रीनशॉट आहेत.
- एका युजरने म्हटले होते- पुरुषाच्या बॉडीवाली मुलगी म्हटले तर वाईट वाटू नका’. ती ट्रान्सजेंडर आहे.
- ‘दुसऱ्याने म्हटले-‘ ही पुरुषाच्या बॉडीसारखी तापसी असू शकते.
- ‘दुसरे म्हणाले-‘ ती ट्रान्सजेंडर आहे.
- ‘एकाने लिहिले-‘ पुरुषासारखी दिसत आहे. लिंग बदलण्याचा हेतू?
- तापसीने काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एका यूजरला उत्तर दिले होते जेव्हा त्याने तिच्या फोटोवर कमेंट केली आणि तिला पुरुषासारखी बॉडी असल्याचे म्हटले.
- यूजरने तापसीच्या फोटोवर कमेंट केली होती ज्यात ती कॅमेऱ्यासमोर पाठ दाखवून उभी आहे आणि ती एक अॅथलेटिक बॉडी दाखवत आहे.
- वास्तविक चित्रपट या मुद्द्याकडे लक्ष वेधतो ज्यात लिंगाच्या आधारावर भेदभाव केला जातो.
तापसीचे ट्रोलर्सना उत्तर
ट्रोलर्सना प्रत्युत्तर देताना तापसीने ट्वीट केले की, ‘माझे सर्वांना मनापासून आभार.
पण अशा अनेक स्त्रिया आहेत जे अशा गोष्टी कोणत्याही दोषाशिवाय रोज ऐकतात.
सर्व खेळाडूंना सलाम ज्या क्रीडा आणि देशासाठी आपले रक्त आणि घाम गाळणातात पण त्यांना हे सर्व ऐकावे लागते.