मुक्तपीठ टीम
अनेकदा आपल्याकडून चुकून एखादा मेसेज किंवा फोटो स्टेटसवर अपलोड होतो. कित्येकदा आपल्याकडून नकळत स्टेटस ठेवला जातो, ती चूक दुरुस्त करण्यासाठी उशीरही होऊ शकतो. त्यामुळेच स्टेटस अपलोड होताच आपल्याला समजणे गरजेचे आहे. असाच एक पर्याय आता उपलब्ध होणार आहे. व्हाट्सअॅपच्या बिटा यूजर्सना लवकरच स्टेटस अनडू करण्याचे फिचर उपलब्ध होणार आहे.
जर चुकून स्टेटस अपलोड झाला असेल तर अनडू ऑप्शनमुळे त्वरीत ही चूक सुधारता येणार आहे. व्हाट्सअॅपच्या बिटा यूजर्सना हा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. स्टेटस अपलोड झाल्यानंतर अनडू ऑप्शनवर क्लिक केल्यास स्टेटस आपोआप डिलीट होईल. iOS बिटा यूजर्सना आता हा पर्याय उपलब्ध आहे. अजूनही अनेक फोनमध्ये हा पर्याय उपलब्ध नाही. याचा अर्ध त्या फोनसाठी अजून हा पर्याय रोल आऊट करण्यात आलेला नाही.
व्हॉट्सअॅप यूजर्सना स्टिकर्स जलद फॉरवर्ड करण्याच्या पर्यायावरदेखील काम सुरू आहे. व्हॉट्सअॅपने स्टिकर्सच्या पुढे एक नवीन शॉर्टकट जोडला आहे जो वापरकर्त्यांना स्टिकर्स फॉरवर्ड करण्यास अनुमती देईल. मेसेज थ्रेडमधील स्टिकरच्या पुढे फॉरवर्ड शॉर्टकट दिसेल. शॉर्टकटवर टॅप करून सर्व संपर्कांना पाठवणे शक्य आहे. या फिचरमुळे वापरकर्त्यांना स्टिकर टॅप करून संपर्कांना फॉरवर्ड करण्याच्या दीर्घ प्रक्रियेतून जावे लागणार नाही.