Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

April 19, 2022
in विशेष
0
Unveiling of Special Postage Stamp by governor bhagat singh koshyari

मुक्तपीठ टीम

भारतरत्न महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांनी धर्मशास्त्र व भारतीय संस्कृती याविषयी केलेले अफाट संशोधन कार्य केवळ थक्क करणारे आहे. आपल्या कार्यातून काणे यांनी देश, समाज व संस्कृतीचा गौरव वाढविला. विद्यापीठ, संशोधक व शिक्षणतज्ज्ञांनी संकल्प करून त्यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

Unveiling of Special Postage Stamp by governor bhagat singh koshyari

थोर कायदेपंडित व धर्मशास्त्राचे अभ्यासक महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांच्या  ५० व्या स्मृतीदिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

एशियाटिक सोसायटी तसेच टपाल विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाला सोसायटीच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष एकनाथ क्षीरसागर, सोसायटीच्या अध्यक्ष विस्पी बालापोरिया, विश्वस्त डॉ भालचंद्र मुणगेकर, महाराष्ट्र सर्कलच्या मुख्य पोस्ट मास्तर जनरल वीणा श्रीनिवास, मुंबई सर्कलच्या पोस्ट मास्टर स्वाती पांडे, सोसायटीच्या कार्यवाह मानद सचिव मंगला सरदेशपांडे तसेच काणे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Unveiling of Special Postage Stamp by governor bhagat singh koshyari

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले,सार्वजनिक जीवनात वावरत असताना देखील काणे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जोपासलेल्या व्यासंगाचा विचार करतो त्यावेळी हे कुणी अवतारी पुरुषच असावे असे आपल्याला वाटते असे नमूद करून एशियाटीक सोसायटीमध्ये बसून त्यांच्यासारख्या महान लोकांनी तपस्या केली असल्यामुळे ज्ञानाचे भंडार असलेली सोसायटी सर्व संकटांवर मात करून अवश्य जगेल याबद्दल आपण आश्वस्त असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

काणे यांनी लिहिलेल्या धर्मशास्त्राचे हिंदी अनुवादित खंड वाचले असल्याचे नमूद करून विद्यापीठांमध्ये आता आंतरशाखीय अध्ययनाचे पर्याय उपलब्ध असताना संशोधकांनी काणे यांचे ग्रंथ अवश्य अभ्यासावे. त्यातून समाजाला उत्तम नेतृत्व लाभेल असे राज्यपालांनी  सांगितले.

 

एशियाटिक सोसायटी तसेच पोस्ट विभागाचे नेतृत्व कर्तृत्ववान महिला करीत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला. सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ सुरज पंडित यांनी काणे यांच्या कार्याचा परिचय करून दिला तर मंगला सरदेशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.


Tags: governer bhagat singh koshyariMahamahopadhyaya Pandurang Vaman KaneSpecial Postal Ticketमहामहोपाध्याय पांडुरंग वामन काणेविशेष टपाल तिकिट
Previous Post

एमएमआरडीएमार्फत मुंबईत सुरु कामांचा आदित्य ठाकरेंकडून आढावा

Next Post

मनसेकडून अक्षय तृतीयेला राज्यभर महाआरती आणि हनुमान चालिसा! ईदही त्याच दिवशी!!

Next Post
Raj Thackeray

मनसेकडून अक्षय तृतीयेला राज्यभर महाआरती आणि हनुमान चालिसा! ईदही त्याच दिवशी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!