मुक्तपीठ टीम
सागर किनारा, लाटांचा आवाज आणि वाहणाऱ्या वाऱ्याच्या संगतीने चालणारा हा वर्ग चित्रपटातील नव्हे तर प्रत्यक्षातील एका शाळेचा आहे. ही शाळा आहे स्पेनमधील ही शाळा समुद्रकिनार्यावर असा वर्ग भरवते. विद्यार्थ्यांना मोकळ्या हवेत श्वास घेता यावा आणि त्यांच्या मनावरील संसर्गाचे दडपणही दूर व्हावे, असे शाळेला वाटते. स्पेनच्या मर्सिया येथील खासगी शाळेने ‘फ्रेश एअर’ नावाचा हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
३ ते १२ वर्षाच्या मुलांचे वर्ग किनाऱ्यावर होतात. येथे अभ्यासाबरोबरच कोरोना महामारी व त्यामुळे होणाऱ्या हानीबद्दलची माहिती दिली जाते. इंग्रजी विषयाचे शिक्षक जुआन फ्रान्सिस्को मार्टिनेझ म्हणाले की, किनाऱ्यावर अभ्यास करताना विद्यार्थ्यांना मजा वाटू लागली आहे. ते अभ्यास एकाग्रतेने करत आहेत.
असा भरवला जातो समुद्र किनाऱ्यावर वर्ग
• समुद्रकिनारी भरलेल्या या वर्गात मुलांना डिस्टन्सिंगसह बसवले जाते.
• २० मिनिटांच्या वर्गानंतर नवनवीन उपक्रम करवून घेतले जातात. मासे पकडणे व जाळे फेकणे इत्यादी.
• मुलांना अनेक गोष्टी लाइव्ह प्रात्यक्षिकांसह शिकवल्या जात आहे.
• व्यंगचित्र व गोष्टींद्वारे त्यांना शिकवले जात आहे.
• शिक्षकांचे असे म्हणणे आहे की, मुले गोष्टींतून जास्त शिकतात त्यांना शिकवण्यासाठी ही पद्धत प्रभावी सिद्ध होत आहे.
पाहा व्हिडीओ: