Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

बीएसएनएलच्या १ लाख ६४ हजार कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी!

July 28, 2022
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, सरकारी बातम्या
0
BSNL-Logo

मुक्तपीठ टीम

दूरसंचार हे धोरणात्मक क्षेत्र आहे. दूरसंचार कंपन्यांच्या जाळ्यात बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेड बाजार समतोल साधण्याचे काम करते. ग्रामीण भागात दूरसंचार सेवांचा विस्तार, स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास आणि आपत्ती निवारणात बीएसएनएल महत्त्वाची भूमिका बजावते.

बीएसएनएलला आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करण्याकरिता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज बीएसएनएलच्या १.६४ लाख कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी दिली.

बीएसएनएल सेवा सुधारणा, स्पेक्ट्रमचे वाटप, ताळेबंदावरचा दबाव कमी करण्यासाठी आणि भारत ब्रॉडबँड निगम लिमिटेड (BBNL) चे बीएसएनएल मध्ये विलीनीकरण करून त्याचे फायबर नेटवर्क वाढवण्यासाठी नवीन भांडवल घालण्यावर मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या पुनरुज्जीवन उपायांचा भर आहे.

बीएसएनएल सेवा अद्ययावत करणे

स्पेक्ट्रमचे प्रशासकीय वाटप: विद्यमान सेवा सुधारण्यासाठी आणि 4G सेवा प्रदान करण्यासाठी, BSNL ला ९००/१८०० MHz बँडमध्ये प्रशासकीयरित्या ४४,९९३ कोटी रुपये किमतीच्या समभागांच्या गुंतवणुकीद्वारे स्पेक्ट्रमचे वाटप केले जाईल. या स्पेक्ट्रमसह, बीएसएनएल बाजारपेठेत स्पर्धा करू शकेल आणि ग्रामीण भागांसह त्यांच्या विशाल नेटवर्कचा वापर करून हायस्पीड डेटा प्रदान करू शकेल.

भांडवली खर्चासाठी आर्थिक सहाय्य: स्वदेशी तंत्रज्ञान विकासाला चालना देण्यासाठी, बीएसएनएल आत्मनिर्भर 4G तंत्रज्ञान स्टॅक तैनात करण्याच्या प्रक्रियेत आहे. पुढील ४ वर्षांचा अंदाजित भांडवली खर्च पूर्ण करण्यासाठी, सरकार २२,४७१ कोटी रुपयांचा भांडवली खर्च निधी देईल. आत्मनिर्भर 4G स्टॅकच्या विकासासाठी आणि तैनातीसाठी ही महत्त्वपूर्ण चालना ठरेल.

ग्रामीण वायर-लाइन कार्यान्वयनासाठी व्यवहार्यता तफावत निधी: व्यावसायिक अव्यवहार्यता असूनही, बीएसएनएल सरकारच्या सामाजिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ग्रामीण/दुर्गम भागात वायर-लाइन सेवा प्रदान करत आहे. २०१४-१५ ते २०१९-२० या कालावधीत व्यावसायिकदृष्ट्या अव्यवहार्य ग्रामीण वायर-लाइन कार्यान्वयनासाठी व्यवहार्यता तफावत निधी म्हणून सरकार बीएसएनएल ला १३,७८९  कोटी रुपये प्रदान करेल.

अधिकृत भांडवलात वाढ: एजीआर अर्थात समायोजित एकूण महसूल देय,भांडवली खर्चाची तरतूद आणि स्पेक्ट्रम वाटप यासाठी बीएसएनएल चे अधिकृत भांडवल ४०,००० कोटी रुपयांवरून १,५०,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवले जाईल.
बीएसएनएलच्या ताळेबंदावरील ताण कमी करणे

कर्ज संरचना: दीर्घकालीन कर्ज उभारण्यासाठी सरकार या सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांना सार्वभौम हमी देईल. ते ४०,३९९ कोटी रुपयांचे दीर्घकालीन रोखे उभारण्यास सक्षम असतील. यामुळे विद्यमान कर्जाची पुनर्रचना करण्यात आणि ताळेबंदावर ताण कमी करण्यास मदत होईल.

समायोजित एकूण महसुली देयांसाठी आर्थिक सहाय्य: ताळेबंदात आणखी सुधारणा करण्यासाठी, बीएसएनएल ची ३३,४०४ कोटी रुपयांची समायोजित एकूण महसुली देय रक्कम समभागात रुपांतरित करून निकाली काढली जाईल. एजीआर/जीएसटी थकबाकी भरण्यासाठी सरकार बीएसएनएलला निधी देईल.

प्राधान्य समभाग पुन्हा जारी करणे: बीएसएनएल सरकारला ७,५०० कोटी रुपयांचे प्राधान्य समभाग पुन्हा जारी करेल.
बीएसएनएल फायबर नेटवर्क विस्तार

BBNL आणि BSNL चे विलीनीकरण: भारतनेट अंतर्गत स्थापित केलेल्या पायाभूत सुविधांचा व्यापक वापर सुलभ करण्यासाठी, भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) चे भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विलीनीकरण केले जाईल. भारतनेट अंतर्गत तयार केलेली पायाभूत सुविधा राष्ट्रीय संपत्ती म्हणून कायम राहील, सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांना भेदभावाशिवाय उपलब्ध होईल.
या उपायांमुळे, BSNL विद्यमान सेवांचा दर्जा सुधारण्यास, 4G सेवा सुरू करण्यास आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनण्यास सक्षम होईल. या पुनरुज्जीवन योजनेच्या अंमलबजावणीमुळे, BSNL आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये नफा मिळवेल अशी अपेक्षा आहे.


Tags: BSNLRevival ProjectUnion Cabinetकेंद्रीय मंत्रिमंडळपुनरुज्जीवन पॅकेजबीएसएनएल
Previous Post

मोबाईल सेवा नसणाऱ्या गावांना 4G सेवेसाठी २६ हजार कोटी

Next Post

फिफाच्या १७ वर्षाखालील महिलांच्या विश्वचषक स्पर्धेचे भारतात आयोजन होणार

Next Post
FIFA U17 Womens WorldCup

फिफाच्या १७ वर्षाखालील महिलांच्या विश्वचषक स्पर्धेचे भारतात आयोजन होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!