Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा लगतच्या सबवेच्या धर्तीवर जोगेश्वरी हायवेखालीही भुयारी मार्ग

आमदार रविंद्र वायकर यांचा एमएमआरडीए आयुक्तांकडे प्रस्ताव

February 2, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Jogeshwari Vikhroli junction junction

अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम

दक्षिणेकडून उत्तरेकडे. उत्तरेकडून दक्षिणेकडे. पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे. हे सारं कमी की काय जोगेश्वरी, गोरेगावच्या छोट्या रस्त्यांवरूनही सर्व्हिस रोडमार्गे वेस्ट्रन एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक सुरुच असते. सतत. अविरत. वाहनांची गजबज. अगदी रोज या रस्त्यांचा वापर करणारे स्थानिक जोगेश्वरी, गोरेगाव या उपनगरांमधील नागरिकही रस्ता ओलांडताना बिचकतात. शालेय विद्यार्थ्यांच्या काळजीने पालक बेजार होतात. त्यामुळेच जोगेश्वरीचे स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांनी मुंबईतील वेस्टर्न हायवे आणि जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जंक्शनच्या खालून भुयारी पादचारी मार्ग बांधण्याची संकल्पना मांडली आहे. त्यांनी एमएमआरडीए आयुक्तांना तसा प्रस्तावही पत्राद्वारे पाठवला आहे.

 

जोगेश्वरीसाठी दक्षिण मुंबईतील भुयारी मार्गासारखा पर्याय

  • पश्‍चिम द्रुतगती महामार्ग व जोगेश्‍वरी विक्रोळी जोडरस्ता जंक्शन येथून रस्त्याच्या दुतर्फा राहणार्‍या रहिवाशांना तसेच पादचार्‍यांच्या सोयीसाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
  • अपघातविरहीत रस्ता ओलांडणे शक्य व्हावे यासाठी दक्षिण मुंबईतील काळाघोडा परिसरात मेट्रो सिनेमालगत उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे उदाहरण देण्यात आले आहे.
  • त्याच भुयारी मार्गाच्या धर्तीवर पश्‍चिम द्रुतगती महामार्ग व जोगेश्‍वरी विक्रोळी जोडरस्ता जंक्शनवर भुयारी मार्ग बांधण्यात यावा, असे पत्र जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी एमएमआरडीए आयुक्तांना पाठवले आहे.

 

आधीच्या वाहतुकीच्या त्रासात मेट्रो बांधकामामुळे भर!

  • एमएमआरडीएमार्ङ्गत मेट्रो मार्गिका क्रमांक ६ स्वामी समर्थ नगर अंधेरी (पश्‍चिम) ते कांजुर मार्ग व मेट्रो मार्गिका क्रमांक ७ अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या दोन मेट्रो मार्गिकेचे काम सध्या या ठिकाणी सुरू आहे.
  • जोगेश्‍वरी (पूर्व) पश्‍चिमेस जोडणार्‍या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर या ठिकाणी रस्ते वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

 

जोगेश्वरीच्या या जंक्शनवर वाढती वाहतूक, अपघाताचा वाढता धोका!

  • या दोन्ही मेट्रो रेल्वेची बांद्रेकरवाडी व एमएमआरडीए कॉलनी येथे मेट्रो स्थानके होणार आहेत. या महामार्गालगत कामगार वस्ती ही तुलनात्मकदृष्या जास्त आहे.
  • पश्‍चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ट्रामा केअर सेंटर, अस्मिता विद्यालय या संस्था असल्याने रहदारीही जास्त असते.
  • या महामार्गालगतच प्रतापनगर, शिवटेकडी, रामवाडी, मजास गाव टेकडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वसली आहे.
  • येथील रहिवाशांना महामार्गावरुन भरधाव जाणार्‍या गाड्यांच्या मधून जीवावर उदार होऊन रस्ता ओलांडावा लागतो.

 

मेट्रोसारख्या भुयारी मार्गाने सुटेल समस्या

  • मुंबई शहरातील मेट्रो सिनेमा येथील चारही दिशेस रस्ते जात असल्याने येथून पादचार्‍यांना अपघात विरहीत रस्ता ओलांडता यावा यासाठी या ठिकाणी भुयारी मार्गाची निर्मिती करुन रहदारी सुरक्षित करण्यात आली आहे.
  • परंतु पश्‍चिम द्रुतगती महामार्ग ते जोगेश्‍वरी विक्रोळी जोडरस्ता जंक्शन या ठिकाणी अशाप्रकारे भुयारी मार्ग नसल्याने हे जंक्शन अपघाताचे केंद्र बनत चालले आहे.
  • या ठिकाणी वाहतुक कोंडीची परिस्थिती पाहता भुयारी मार्गाची नितांत आवश्यकता असल्याने वायकर यांनी २०१३ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता तसेच सह सचिव, विकास विभागाचे कार्यकारी अभियंता विभाग क्र.४, अंधेरी (पश्‍चिम) यांच्याकडे पत्रव्यवहारही केला आहे.
  • नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रथम प्राधान्य देत येथील प्रस्तावित भुयारी मार्गास आवश्यक ती परवानगी मिळावी व मेट्रो मार्गिकेच्या कामाबरोबरच या कामाला प्राधान्य देऊन, नागरीकांना दिलासा द्यावा, असे पत्र आमदार रविंद्र वायकर यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यांना पाठविले आहे.

पाहा व्हिडीओ:

 

 


Tags: good newsJogeshwari HighwayJogeshwari Vikhroli junction junctionMetro CinemaMLA Ravindra VaikarMMRDA Commissionermuktpeethsouth mumbaiSubwayWest Expresswayआमदार रविंद्र वायकरएमएमआरडीए आयुक्तचांगल्या बातम्याजोगेश्‍वरी विक्रोळी जोडरस्ता जंक्शनजोगेश्वरी हायवेदक्षिण मुंबईपश्‍चिम द्रुतगती महामार्गभुयारी मार्गमुक्तपीठमेट्रो सिनेमा
Previous Post

आईच्या वाढदिवसाला संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना रेशन किटची आपुलकीची भेट!

Next Post

मुंबईतील १९ रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार, अत्याधुनिक सुविधांनी सज्ज होणार

Next Post
mumbai local

मुंबईतील १९ रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार, अत्याधुनिक सुविधांनी सज्ज होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!