मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचीही भीती व्यक्त केली जात आहे. वाढत्या संसर्गामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर पडणारा भार लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील फॅमिली डॉक्टर्सचे नेटवर्क उभारण्याची योजना आखली आहे. त्यांचे विश्वासू कोकणातील खासदार विनायक राऊतांवर त्यांनी फॅमिली डॉक्टर्सचे नेटवर्क उभारण्याची जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्सच्या माध्यमातून फॅमिली डॉक्टर्सशी संवाद साधणार आहेत.
कोरोनाविरोधात फॅमिली डॉक्टर्स नेटवर्क
• फॅमिली डॉक्टर्सची मदत घेण्याचे कारण म्हणजे, अनेकजणांचा आपल्या फॅमिली डॉक्टरवर विश्वास असतो.
• त्यांचे सल्ले नागरिक सहजपणे घेतात.
• त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाचा विश्वास असतो.
• कुटुंबातील प्रत्येकाची वैद्यकीय माहिती फॅमिली डॉक्टर्सना असते.
• यामुळेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री फॅमिली डॉक्टर्सची मदत घेणार आहेत.
• फॅमिली डॉक्टर्सच्या माध्यमातून कोरोना संसर्ग कसा टाळावा याचबरोबर संसर्ग झालाच तर प्राथमिक उपचार काय असावे, याचे मार्गदर्शन सौम्य लक्षणे असलेल्यांना केले जाईल.
• यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे.