मुक्तपीठ टीम
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांविरूद्ध खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. कोश्यारींना राज्यपालपदावरून हटवण्याची मागणी ते वारंवार करत आहेत. त्यांनी रायगडावर आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. आज रायगडावर ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळावा घेत शिवप्रेमींना संबोधित करताना भाजप आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना त्यांनी पुढच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. पुढचा ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळावा मुंबईच्या आझाद मैदानावर होणार असल्याचं उदयनराजेंनी जाहीर केलं आहे.
“आता पुढची लढाई आझाद मैदानावर”
- राज्यपालपदावर विराजमान असलेली व्यक्ती जर असं वक्तव्य करत असेल तर शिवरायांचा महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही.
- आझाद मैदान लांब नाही.
- एक तारीख ठरवून मुंबईच्या आझाद मैदानावर जायचं.
- महाराजांच्या सन्मानासाठी इथून पुढेही आपल्याला लढा द्यायचा आहे.
- तेव्हा तयारीला लागा, असं म्हणत उदयनराजेंनी पुढच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
“कोण राज्यपाल?, कोणता प्रोटोकॉल?…चुकीचं ते चुकीचंच आहे!”
- राज्यात राज्यपाल आहे.
- या लोकांना महाराजांचा अपमान करणं अंगवळणी पडलं आहे.
- अशा विकृतांचं फावलं आहे.
- एक बोलला म्हणून दुसरा बोलतो.
- कोण राज्यपाल? त्यांचं नाव घ्यायचं नाही.
- ते कधी मोठे नव्हतेच.
- राज्यपाल पद हे सर्वात मोठं आहे.
- ते सन्मानाचं पद आहे.
- कोणता प्रोटोकॉल?
- चुकीचं हे चुकीचं आहे.
- राज्यपाल यांची उचलबांगडी होत नाही तोपर्यंत थांबणार नाही.
- इथे असते तर टकमक टोकावरून फेकून दिलं असतं असंही उदयनराजे म्हणाले.
- हे लोक जर समर्थन करत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असं आव्हानच उदयनराजे भोसलेंनी त्यावेळी केलं.
“महाराजांचा अवमान हा आपला अपमान वाटत नाही का?”
- केवळ शिवाजी महाराजच नाही तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंची खिल्ली उडवावी असा अवमान राज्यपालांनी केला.
- सगळे अपमान पाहत बसले आहेत.
- महाराजांचा अवमान हा आपला अपमान वाटत नाही का?
- आपण काही करणार आहोत की नाही?
- या राजकारण्यांच्या किती दिवस तावडीत राहणार?
- आज हा देश विकृत लोकांच्या तावडीत गेला.
- हे सांगताना खंत वाटते, असं वेदना त्यांनी व्यक्त केली.
महाराजांनी रयतेचा विचार केला होता!
- भीती वाटते. खंत वाटते. वेदना होतात. किती स्वार्थी आणि व्यक्ती केंद्रीत लोक झाले आहेत.
- लोकांमध्ये वितुष्ट जरी आलं तरी चालेल पण माझा स्वार्थ साधला गेला पाहिजे.
- मी सत्तेत आलो पाहिजे, हा विचार महाराजांनी केला नव्हता.
- त्यांनी रयतेचा विचार केला होता.
- तुमचा आमचा विचार केला होता, असं ते म्हणाले.
शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं, आज तीच रयत स्वार्थ पाहतेय!
- अनेक राज्यांचे राज्य त्या राजांच्या नावाने ओळखलं गेलं.
- पण शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जातं.
- आज तीच रयत स्वार्थ पाहताना दिसत आहे.
- राजकीय स्वार्थ साधत आहे.
- त्यामुळेच महाराजांचा अवमान करण्याचं धाडस होत आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.