मुक्तपीठ टीम
मॅरेथॉन मॅरेथॉन म्हटलं की जिंकण्याची जिद्द. त्यासाठीचे आटोकाट प्रयत्न ठरलेलेच. पण या वर्षीच्या न्यूयॉर्क मॅरेथॉनमध्ये घडलेली जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे, ते दाखवणारी. न्यूयॉर्क मॅरेथॉनच्या दरम्यान एक धावपटू अंतिम रेषेच्या अगदी आधी खाली कोसळला. तो स्पर्धक धावपटू पडल्यानंतर त्याच्या मागे असलेल्या दोन स्पर्धकांनी त्याला मदत केली आणि त्याला अंतिम रेषा पार करण्यास मदत केली. लावली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे आणि लोकांना तो खूप आवडला आहे. जसा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आवडणारा आहे, तसाच तो प्रसंग तिथं उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचीही मनं जिंकणाराही ठरला. प्रेक्षकांच्या दृष्टीने अंतिम रेषा सर्वात आधी कोणीही ओलांडली असेल, पण जिंकली ती त्या दोन स्पर्धकांनीच
धावपटू २०० मीटर अंतरावर पडला
- मॅरेथॉन दरम्यान, काळ्या टँक टॉपमधील एक धावपटू अडखळला.
- अंतिम रेषेपासून सुमारे २०० मीटर अलीकडे पडला.
- धावपटू पूर्णपणे थकला होता आणि त्याला नीट उभेही राहता येत नव्हते. त्याच्या मागे असलेले दोन सहकारी धावपटू त्याच्या मदतीसाठी पुढे आले. त्यांनी धावपटूला उचलले आणि त्याला अंतिम रेषेपर्यंत जाण्यास मदत केली. यावेळी मॅरेथॉन पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी दोन्ही धावपटूंना टाळ्या वाजवून चिअर केले.
टिकटॉक यूजरने टिपला व्हिडीओ
- टिकटॉक यूजरने हा व्हिडिओ बनवला आहे. मॅरेथॉन पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या अँडी केंट या टिकटॉक यूजरने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला.
- तो व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
४२ किलोमीटरची शर्यत
- ही मॅरेथॉन ४२ किलोमीटरपेक्षा जास्त आहे.
- यादरम्यान, स्पर्धक न्यूयॉर्कच्या पाच प्रमुख स्थानांवरून जातात.
- ही शर्यत स्टेटन आयलंडपासून सुरू होते आणि सेंट्रल पार्कमध्ये संपते.