Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जोगेश्वरीत दोन ठिकाणी लवकरच लसीकरण होणार

'मातोश्री आर्ट्स आणि स्पोर्ट्स ट्रस्ट’ व ‘बाल विकास विद्या मंदिर’ येथे लवकरच लसीकरण केंद्र

April 27, 2021
in घडलं-बिघडलं
0
vaccination

मुक्तपीठ टीम

सर्वसामान्य जनतेला शासनाच्या नियमानुसार कोरोनापासून बचाव करणारी लस वेळीच दिल्यास नागरिकांना दिलासा मिळेल या हेतूने जोगेश्वरी विधासभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानसभा क्षेत्रातील ‘मातोश्री आर्टस आणि स्पोर्टस ट्रस्ट’ तसेच  ‘बाल विकास विद्या मंदिर’ येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची सूचना केली आहे. या सुचनेला मनपाच्या के पूर्व विभागाने अनुकुलता दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच या दोन्ही ठिकाणी मनपामार्फत लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असला तरी तो पूर्ण नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या महामारीपासून राज्य शासन व प्रशासनातील विविध यंत्रणा नागरिकांचा या महामारीपासून बचाव करण्यासाठी शर्थीचे  प्रयत्न करीत आहेत. कोरोना लसीकरण मोहीम ही शासन आणि प्रशासनाच्या रुग्णालयात तसेच विविध लसीकरण केंद्रात सुरू आहे. ज्या ज्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे त्या सर्व ठिकाणी लस घेण्यासाठी जनतेची मोठ्याप्रमाणात गर्दी होत आहे.

जनतेची वाढती गर्दी लक्षात घेता केंद्राची संख्या वाढून या लसीकरणाचा लाभ वेळीच जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा या हेतूने जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील ‘मातोश्री आर्टस आणि स्पोर्टस ट्रस्ट’ व ‘बाल विकास विद्या मंदिर’ या दोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, असे पत्र आमदार रविंद्र वायकर यांनी सहाय्यक आयुक्त, के पूर्व यांना दिले होते. या पत्रानुसार के पूर्वचे वैद्यकीय अधिकारी, परिरक्षण विभागाचे अधिकारी, नगरसेवक बाळा नर यांनी या दोन्ही जागांची पहाणी केली. ही केंद्रं सुरू करण्यासाठी आवश्यक लसीकरण कक्ष, प्रतिक्षा कक्ष, निरीक्षक कक्ष, नोंदणी करीता आवश्यक जागा या ठिकाणी उपलब्ध असल्याने या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी अनुकुलता दर्शवली असल्याचे पत्र दिनांक २४ एप्रिल रोजी आमदार यांना पाठविले आहे. त्यामुळे या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच लसीकेंद्र सुरू करण्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या अगोदर ‘मातोश्री आर्टस आणि स्पोर्टस ट्रस्ट’ येथे मनपामाफॅत तात्पुरते कोरोना सेंटर सुरू करण्याची सुचनाही वायकर यांनी पत्राद्वारे मनपा आयुक्तांना केली आहे. नगरसेवक बाळा नर यांनीही लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, के पूर्व यांना पत्र दिले होते.


Tags: bala narCorona VirusJogeshwarimatoshree arts and sports trustravindra vaikarकोरोनाजोगेश्वरीनगरसेवक बाळा नरबाल विकास विद्या मंदिरमातोश्री आर्टस आणि स्पोर्टस ट्रस्टरविंद्र वायकर
Previous Post

एफएसएसएआयमध्ये वरिष्ठ पातळीवर करिअर संधी

Next Post

बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत २२ मृतदेह कोंबले! आता तातडीने आणखी दोन रुग्णवाहिका

Next Post
beed

बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत २२ मृतदेह कोंबले! आता तातडीने आणखी दोन रुग्णवाहिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!