मुक्तपीठ टीम
जत्रा, यात्रा म्हटलं की मराठी माणूस जगात कुठेही असला तरी गावी पोहचण्याचा प्रयत्न करतोच करतो. मनानं तर तो तिथं असतोच असतो. सांगलीच्या ‘नागनाथ’ यात्रेतील बगाड पळविण्याचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या या सोहळ्यास भाविकांची मोठी गर्दी होती.
कोरोनात खंड पडलेल्या यात्रा आता उत्साहानं आयोजित होत आहेत. सांगली जिल्ह्यातील नागेवाडी येथील ग्रामदैवत श्री नागनाथ देवाच्या यात्रा नुकतीच झाली.या यात्रेतील खास वैशिष्ट्य असलेली लाकडी बगाड पळविण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कोरोनाचे निर्बंध उठवल्या नंतर बगाड पाहण्या साठी भाविकानी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. येथील बगाडाला सुमारे पावणे दोनशे वर्षांची परंपरा आहे.
लाकडी बगाड, दगडी चाकं!
खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील ग्रामदैवत नागनाथ देवाच्या यात्रे निमित्त गुडीपाढव्यापासून ह्या यात्रेला सुरुवात होते . ही यात्रा चार दिवस चालत असून या यात्रेचे वैशिष्ट्य हे लाकडी बगाड पळविण्याच्या कार्यक्रम. या मध्ये एकूण सात बगाड असून बैलाच्या सहाय्याने बगाड पळविण्यात येतात आणि मंदिराला प्रदक्षिणा घालतात. हे बगाड पूर्णपणे लाकडी असून केवळ त्याची दोन चाके दगडी असतात. बगाड बाधणी करताना दोरी ला कोटेही गाठ दिली जात.
बगाडाचे मानकरी बारा बलुतेदार!
या बगाडाचे मानकरी हे बारा बलुतेदार असून प्रत्येक समाजाला वेगवेगळा मान आहे. यादव समाजाचा मान बगाड बांधणीचा आहे, तर तेली समाजाचा मान हा बगाडाला वंगण घालण्याचा आहे. सर्व जाती धर्माचे लोक आणि भाविक भक्तिभावाने या नागनाथ यात्रेस येतात. बागड पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर , सातारासह पश्चिम महाराष्ट्र आणि इतर राज्यातील जे लोक बाहेर काम करतात ते या यात्रे निमित्त आपली हजरी लावतात.