मुक्तपीठ टीम
सध्याच्या काळात सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर हा सामान्यांच्या जीवनांवर प्रभाव टाकत असतो. त्याचा फायदा घेण्यास राजकारण्यांसह हितसंबंधितांनी सुरुवात केली असल्याचे आरोप होत असतात. आता मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरचा अल्गोरिदम हा डाव्या विचारसरणीपेक्षा प्रतिगामी विचारसरणी अधिक प्राधान्य देणारा असल्याचे एका संशोधनातून उघड झाले आहे. संशोधन करणाऱ्या कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांनी ट्विटरचे अल्गोरिदम कसे कार्य करते याचा अभ्यास केला. हे समोर आले की, ट्विटरवर यूजर्समधील प्रतिगामी विचारसरणीच्या राजकीय पक्षांच्या ट्विट्सची शिफारस जास्त केली जाते.
ट्विटर अल्गोरिदम तपासण्यासाठी सात देशांचा अभ्यास
- सोशल मीडिया जायंटने हा अभ्यास जगातील सात देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिकेवर केला आहे.
- या देशांच्या राजकीय पक्षांनी ट्विटरवर शेअर केलेल्या सामग्रीची १ एप्रिल २०२० ते १५ ऑगस्ट दरम्यान तपास करण्यात आला.
- यामध्ये असे दिसून आले की ट्विटरचे अल्गोरिदम कोणत्या ट्वीट्सला सर्वाधिक प्रोत्साहन देत आहे.
- डाव्या विचारसरणीच्या पक्षांपेक्षा मुख्य प्रवाहातील प्रतिगामी विचारसरणी पक्षांच्या ट्विटला अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.
असं का घडतं, ते शोधण्याचा ट्वविटरचाही प्रयत्न!
- ट्विटर मेटा टीमचे संचालक रुम्मन चौधरी यांनी सांगितले की, आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की यामागचे कारण काय आहे?
- पुरोगमी विचारसरणीच्या पक्षांच्या तुलनेत प्रतिगामी विचारसरणीच्या पक्षांचे ट्विट अल्गोरिदमिकमुळे जास्त पुढे जात असल्याचे समोर येत आहे.
- ” मात्र, सध्या या प्रश्नांची उत्तरे देणे खूप कठीण आहे, असे ते म्हणाले.
पक्षपातीपणाचे आरोप यापूर्वीही झाले!
- ट्विटच्या अल्गोरिदमवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
- याआधी एप्रिलमध्ये, एका अभ्यासातून असेही समोर आले होते की, ट्विटर काळ्या लोकांपेक्षा पांढऱ्या आणि तरुण चेहऱ्यांना अधिक प्राधान्य देते.
ट्विटरने धोरण बदलले
- संशोधनात असे समोर आले आहे की जेव्हा एका चित्रात दोन चेहरे असतात, तेव्हा पूर्वावलोकनासाठी, ट्विटर दोन्हीमध्ये तुलनेने योग्य असलेले फोटो निवडते.
- यानंतर ट्विटरने आपले धोरण बदलले आणि म्हटले की यूजर्सनी त्यांचे फोटो स्वतः संपादित केले तर चांगले आहे.