मुक्तपीठ टीम
दुचाकी व तीनचाकी वाहने बनविणारी नामांकित कंपनी असलेल्या ‘टीव्हीएस मोटर कंपनी’ने ‘टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ४व्ही’ या मालिकेतील प्रगत श्रेणीची मोटरसायकल सादर करीत असल्याची घोषणा केली आहे. हेडलॅम्पची नवीन असेंब्ली, अनोखा ‘डे टाईम रनिंग लॅम्प’ (डीआरएल) आणि राईडचे तीन प्रकार अशी या मोटरसायकलची वैशिष्ट्ये आहेत. या बरोबरच, कंपनीने ‘अपाचे आरटीआर १६० ४व्ही स्पेशल एडिशन’ ही मोटरसायकलही सादर केली आहे. यामध्ये ‘अॅडजस्टेबल क्लच व ब्रेक लीव्हर’, विशेष मॅट ब्लॅक कलर, रेड अलॉय व्हील्स, नवीन सीट पॅटर्न व नवीन हेडलॅम्प ही या श्रेणीतील पहिलीच अशी वैशिष्ट्ये आहेत.
नव्या मोटरसायकलींमध्ये नवे काय?
‘टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ४व्ही’ आणि ‘टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ४व्ही स्पेशल एडिशन’ या गाड्या आता तीन राईड मोड्समध्ये उपलब्ध होतील – अर्बन, स्पोर्ट व रेन. ‘गियर शिफ्ट इंडिकेटर’ आणि ‘रेडियल रिअर टायर’ हीदेखील वैशिष्ट्ये यात आहेत. अपाचे आरटीआर १६० ४व्हीचे टॉप-एंड व्हेरिएंट हे TVS SmartXonnectTM ने सुसज्ज असेल. ‘टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ४व्ही’ मालिकेतील मोटरसायकल्सना नवीन हेडलॅम्प असेंब्ली बसविण्यात आली आहे. त्यातील ‘सिग्नेचर डीआरएल’ हा सतत उजळलेला राहतो. त्याचे स्थान बदलते राहून ते ‘फ्रंट पोझिशन लॅम्प’मध्ये (एफपीएल) जाते. एकाचवेळी ‘लो’ आणि ‘हाय बीम’मध्ये तो कार्य करीत असतो.
‘टीव्हीएस मोटर कंपनी’चे प्रीमियम मोटारसायकलच्या मार्केटिंगचे प्रमुख मेघश्याम दिघोले हे या सादरीकरणाबाबत म्हणाले, “टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ४व्ही’ मालिकेतील मोटारसायकलींनी नेहमीच आपल्या महत्वाकांक्षी ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. हौशी रेसिंग करणाऱ्यांसाठी या गाड्यांमध्ये सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आणण्यात आले आहे. रेसिंग क्षेत्राच्या गेल्या चार दशकांच्या अनुभवाच्या बळावर आम्ही ‘टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ४व्ही’ मालिकेतील मोटरसायकलींची प्रगत श्रेणी सादर करीत आहोत. या श्रेणीतील सर्वप्रथम अशा स्वरुपाची अनेक वैशिष्ट्ये या मोटरसायकलींमध्ये आहेत. ‘टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ४व्ही’ची स्पेशल एडिशनही सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. ‘टीव्हीएस अपाचे’ मालिकेच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये आणि ‘टीव्हीएस मोटर कंपनी’च्या प्रीमियम दुचाकींमध्ये या ‘स्पेशल एडिशन’मुळे मोलाची भर पडली आहे.”
स्टाईल
‘टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ४व्ही स्पेशल एडिशन’ खास मॅट ब्लॅक रंग, रेड अलॉय व्हील्स आणि नवीन सीट पॅटर्न या वैशिष्ट्यांसह येते. ‘टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ४व्ही’ ही तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल : रेसिंग रेड, मेटॅलिक ब्लू आणि नाइट ब्लॅक.
प्रकार
‘टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ४व्ही’ ही गाडी ड्रम, सिंगल डिस्क आणि रियर डिस्क या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल.
किंमत
‘टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ४व्ही’ या मालिकेतील मोटरसायकली आता भारतातील ‘टीव्हीएस मोटर कंपनी’च्या अधिकृत वितरकांकडे पुढील किंमतींत उपलब्ध आहेत
- टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ४व्ही स्पेशल एडिशन : ₹ १, २१, ३७२ (एक्स-शोरूम, दिल्ली)
- टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ४व्ही (ड्रम) : ₹ १, १५, २६५ (एक्स-शोरूम, दिल्ली)
- टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ४व्ही (सिंगल डिस्क) : ₹ १, १७, ३५० (एक्स-शोरूम, दिल्ली)
- टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ४व्ही (रियर डिस्क) : ₹ १, २०, ०५० (एक्स-शोरूम, दिल्ली)
About TVS Motor Company
TVS Motor Company is a reputed two and three-wheeler manufacturer and is the flagship company of the USD 8.5 billion TVS Group. We believe in Championing Progress through Mobility. Rooted in our 100-year legacy of Trust, Value, and Passion for Customers and Exactness, we take pride in making internationally aspirational products of the highest quality through innovative and sustainable processes. We endeavour to deliver the most superior customer experience at all our touch points across 70 countries. We are the only two-wheeler company to have received the prestigious Deming Prize. Our products lead in their respective categories in the J.D. Power IQS and APEAL surveys for five years. We have been ranked No. 1 Company in the J.D. Power Customer Service Satisfaction Survey for consecutive four years. For more information, please visit www.tvsmotor.com