Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपात अंतर्गत सामना, कोण फुटणार आमदार की नगरसेवक?

October 19, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
bjp pune

मुक्तपीठ टीम

पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली असतानाच भाजपामध्ये अंतर्गत सामना रंगू लागला आहे. भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे हे फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतानाच त्यांनी आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप हे दोन भाजपा आमदारच पक्ष सोडू शकतील असा आरोप केला आहे. गेल्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारी ही मनपा आमदारांनी कमळ हाती घेतल्याने भाजपाकडे गेली होती. आताही तेथे भाजपापेक्षा त्यांची वैयक्तिक ताकद जास्त मानली जाते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी गेल्या काही महिन्यांपासून येथे जोर लावत गमावलेले पुन्हा कमावण्याची तयारी सुरु केल्याने या निवडणुकीआधी खूप काही बदल घडण्याची शक्यता आहे.

 

नगरसेवक कामठे यांनी विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. त्यांनी पत्राद्वारे आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चुकांची यादीच दिली आहे. अद्याप आमदारांनी त्यांना जाहीर उत्तर दिलं नसलं तरी उलट नगरसेवक कामठेंच्या चुकांचा पाढा ते वाचणार असल्याचे कळते. स्थानिक जाणकारांच्या मते आमदार आणि नगरसेवक यांच्यातील वादामागे राजकारणामागे मनपातील अर्थकारणाचा वाद जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक जवळ येत जाईल तसं खूप काही बाहेर येण्याची शक्यता आहे.

 

नगरसेवक तुषार कामठेंचं फडणवीसांना तक्रारीचं पत्र

  • येत्या मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मनपावर पुन्हा भाजपचा झेंडा फडकवण्याचा आपल्या सर्वांचाच मानस आहे.
  • पण गेल्या ५ वर्षांमध्ये शहरातील भाजपचे दोन आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या अनेक चुकीच्या कामांमुळे येत्या निवडणुकांमध्ये भाजपाला याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे’.

 

भाजपच्या मेहनती सर्वसामान्य सच्च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी

  • ‘या आमदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे खापर विरोधी पक्ष व जनता मनपातील आपल्या नगरसेवकांवर फोडणार हे निश्चित.
  • लांडगे व जगताप यांनी शहरात मनमानी व हुकूमशाही पद्धतीने मनपात हस्तक्षेप करत अनेक नगरसेवकांना त्रस्त केले आहे.
  • त्यामुळे आपल्याच पक्षातील काही नगसेवक यांच्या कारभारावर नाराज आहेत.
  • तरी आपण येत्या मनपा निवडणुक तिकीट वाटपाच्या संदर्भात लांडगे गट किंवा जगताप गटाचा समर्थक, नातेवाईक किंवा स्नेही म्हणून निर्णय न घेता भाजपच्या मेहनती सर्वसामान्य सच्च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, अशी आपणास विनंती’.

 

हे दोन्ही आमदार वेळ प्रसंगी पक्ष बदलतील!

  • ‘राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांकडून मी भाजपच्या आमदारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजप पक्ष सोडणार असल्याची चर्चा सध्या शहरात चालू आहे.
  • पण मी भाजपच्या कोणत्याही आमदाराच्या गटातील म्हणून नव्हे तर भाजपचा एक सच्चा शिलेदार म्हणून काम करतो आहे.
  • ज्या दोन आमदारांनी चुकीची कामे केली आहेत ते कदाचित स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पक्षाचा त्याग करू शकतात, तशी शक्यताही सध्या वर्तवली जात आहे.
  • पण मी भाजपच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजकारण करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कायम पक्षाशी एकनिष्ठ राहणार असून पक्षाचे होणारे नुकसान पाहू शकत नाही.
  • हे दोन्ही आमदार वेळ प्रसंगी पक्ष बदलतील परंतु नवीन कार्यकर्ता केव्हा ही पक्ष बदलू शकत नाही.
  • तरी माझ्या विनंतीचा सकारात्मक विचार करून आपण निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती’.

Tags: BJPdevendra fadanvisPimpri Chinchwad Municipal Corporationtushar kamtheतुषार कामठेदेवेंद्र फडणवीसपिंपरी-चिंचवड मनपाभाजपा
Previous Post

अमीश त्रिपाठींची ‘भगवान शिवा’च्या जीवनावरील तीन कादंबरींची मालिका ‘स्टोरीटेल’वर!

Next Post

प्रा.डॉ. दिलीपकुमार ललवाणी यांना जीवनगौरव पुरस्कार २०२१ प्रदान

Next Post
प्रा.डॉ.  दिलीपकुमार ललवाणी यांना जीवनगौरव पुरस्कार २०२१ प्रदान

प्रा.डॉ. दिलीपकुमार ललवाणी यांना जीवनगौरव पुरस्कार २०२१ प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!