Thursday, May 29, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या की हत्या? प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी करण्याची मागणी!

December 26, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Actress Tunisha Sharma

मुक्तपीठ टीम

टीव्ही मालिका अलिबाबामधील अभिनेत्री तुनिषा शर्माने काल टीव्ही सेटवरच गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांनी तिचा सहकलाकार शीजान खानला अटक केली. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तुनिषाच्या आईने त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला मुंबईतील वसई न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सर्वजण, तुनिषा शर्मा प्रकरणात सत्य बाहेर येण्याची वाट पाहत आहेत. तसेच, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन करण्यास सांगितले आहे.

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ते सेटवर गेले असताना, लोक तिथे काहीही सांगायला घाबरत आहेत. अनेक अभिनेत्रींनी त्यांना फोन करून सांगितले की ही हत्या आहे आणि त्यांना याची भिती वाट आहे. यामुळे ते एसआयटीद्वारे चौकशीची मागणी करत आहेत.

पोलीस चौकशीत शीजान खानने कोणती माहिती दिली?

  • मिळालेल्या माहितीनुसार असा दावा करण्यात आला आहे की, शीजान खानने आपल्या जबानीत पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे.
  • सुरुवातीच्या तपासात त्याने तुनिषासोबत संबंध असल्याचे सांगितले.
  • त्यांचे धर्म भिन्न होते आणि वयातही मोठा फरक होता, त्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले.
  • मात्र शीजानच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणे पोलिसांना अवघड जात आहे.

तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात, डॉक्टरांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती…

  • तुनिषाच्या कुटुंबीयांनी शीजानवर अनेक मुलींसोबत अफेअर असल्याचा आरोप केला आहे. यामुळे तुनिषा डिप्रेशनमध्ये गेली.
  • तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात तिच्या काकांनी एक महत्त्वाची माहिती उघड केली आहे.
  • ते म्हणाला की तुनिषाचे वय २० वर्ष होते आणि ती डिप्रेशनमध्ये होती असा दावा केला जात आहे, तर २० वर्षांच्या मुलीला काय डिप्रेशन असेल.
  • मेकर रूममध्ये शीजान आणि तिच्यामध्ये काहीतरी घडले असावे.
  • तुनिषा लॉकडाऊनमध्ये दीड वर्ष त्याच्यासोबत होती आणि ती अजिबात दुःखी किंवा उदास नव्हती.
  • काही दिवसांपूर्वी तुनिषाने डॉक्टरांना भेटून आपली फसवणूक झाल्याचे सांगितले होते, असेही तिच्या काकांनी सांगितले.
  • तिचा वापर करण्यात आला आहे.

अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणाची पोलीस प्रत्येक बाजूने चौकशी करत आहेत. आतापर्यंत १४ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.


Tags: Actress Tunisha SharmaAll India Cine WorkersmuktpeethmumbaiSheejan KhanSITTunisha Sharma SuicideVasai Courtअभिनेत्री तुनिषा शर्माएसआयटीऑल इंडिया सिने वर्कर्सघडलं-बिघडलंतुनिषा शर्मा आत्महत्यामुक्तपीठमुंबईवसई न्यायालयशीजान खान
Previous Post

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समाजोपयोगी उपक्रमातील योगदान गौरवास्पद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी ५००० सीमावासीयांचे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Next Post
Maharashtra Karnataka Border Dispute

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी ५००० सीमावासीयांचे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!