तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट भाष्य महाराष्ट्रातील राजकीय बजबजपुरीमुळे आजवर नाही ती संधी मनसे, आप, वंचित या सारख्या पक्षांसाठी आहे. पण इतर दोघांना काही मर्यादा आहेत. मनसेला तशा नाहीत. त्यामुळेच यावेळी वाटलेलं का गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात राज ठाकरे मनातील बोलतील. स्वत:चं बोलतील. पण तसं झालेलं दिसलं नाही. ते जे काही बोलले ते बोलणारे तोंड जरी त्यांचं असलं तरी मेंदू आणि मन मात्र त्यांचंच होतं असं सांगता येत नाही. राज ठाकरेंनी पुन्हा एकदा संधी गमावली, असंच आता तरी वाटत आहे.