तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
राष्ट्रहित सर्वोपरी! राष्ट्र प्रथम…नंतर पक्ष आणि नंतर आपण स्वत:! भाजपाच्या विचारसरणीतील हे तत्व देशावर प्रेम करणाऱ्या कुणालाही भावेल असंच. पण अनेकदा राजकारणात उक्ती आणि कृतीमध्ये फरक असतोच असतो. नव्हे तसं नसेल तर आपल्या बहुतांश राजकारण्यांना राजकारण केले असे वाटतच नाही. त्यातूनच मग घोळ होतो. दुटप्पीपणाचे राजकारण सुरु होते. काहीवेळा जाणीवपूर्वक तर काहीवेळा अजाणतेपणी देशापेक्षा स्वत:ला, पक्षाला मोठं दाखवलं जातं. अर्थात जाणीवपूर्वक असो वा अजाणतेपणी तसं घडू नयेच.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं शनिवारी निधन झालं. रामजन्मभूमी आंदोलनातील त्यांची आक्रमक भूमिका ही भाजपासाठी फायद्याची ठरली होती. तसंच सामान्य हिंदूंमध्येही त्यांची प्रतिमा उंचावणारी ठरली होती. मधल्या काळात पक्षांतर्गत मतभेदांमुळे ते भाजपाबाहेरही गेले. पण भाजपात २००९च्या पराभवानंतर मोदीपर्व सुरु होताच जसे कर्नाटकातल्या येडियुरप्पा यांना स्वगृही प्रवेश झाला तसाच कल्याण सिंहांचीही स्वतंत्र पक्ष आणि मुलायमसिंहांच्या छावणीतून घरवापसी झाली. ते माजी मुख्यमंत्री होते, राजस्थानचे राज्यपाल होते त्यामुळे त्यांना तिरंग्यात लपेटून अखेरचा निरोप दिला गेला.
बिघडलं ते पुढे. कल्याण सिंहांच्या पार्थिवावरील तिरंग्यावर भाजपाचा झेंडा ठेवण्यात आला. पुन्हा तसं करणारी व्यक्ती ही सामान्य कार्यकर्ता नव्हती. उत्साहाच्या भरात असं झालं असतं तर समजू शकतो. पण ज्यांच्या हातून कल्याण सिंहांच्या पार्थिवावरील तिरंग्यावर भाजपाचा पक्ष झेंडा ठेवला गेला ते अन्य कुणी नव्हे तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा होते. तसेच त्यावेळी ज्यांनी श्रीनगरच्या लालचौकात आपला तिरंगा फडकवण्याचा पराक्रम गाजवण्यात मोठी भूमिका बजावली ते पंतप्रधान नरेंद्र मोदीही समोरच उभे होते. इतरही जाणती मंडळी तिथं होती. तरीही तिरंग्यावर पक्षाचा झेंडा ठेवला गेला. नव्हे त्याची छायाचित्रही भाजपाच्याच ट्विटर हँडलने ट्वीट केली गेली. आजही ती तिथे आहेत. त्यामुळे स्वाभाविकच समाजमाध्यमांमध्ये भाजपावर टीकेचा मारा सुरु झाला आहे. भाजपाने हे असं केलंच कसं असा प्रश्न संतप्त नेटकरी वेगवेगळ्या माध्यमातून विचारत आहेत. त्यातील काही निवडक ट्वीट लेखाच्या शेवटी दिले आहेत.
कल्याण सिंहांच्या पार्थिवावर भाजपाचा झेंडा का?
कल्याण सिंह हे भाजपाचे कडवट नेते. तत्कालीन भाजपाचे नेते अटलबिहारी वाजपेयींशी मतभेद झाले. कल्याण सिंहांना वेगळ्या पक्षाची स्वतंत्र वाट चालावी लागली होती. अगदी बाबरी मशिद पाडण्याचे समर्थन करत राम मंदिरासाठी मुख्यमंत्रीपदाचे बलिदान केले असे सांगणारा हा नेता करसेवकांवर गोळीबार करून त्यांचे बळी घेणाऱ्या समाजवादी पार्टीच्या मुलायम सिंहांशी हातमिळवणी करू लागला होता. पण त्यांच्या मनात होती ती भाजपाच! मनाने, विचाराने ते हिंदुत्ववादीच होते. त्यामुळे पुढे मोदीपर्वात ते स्वगृही परतले. राज्यपालासारख्या संवैधानिक पदावर असतानाही त्यांनी पक्षनिष्ठ भूमिका घेतली. वाद झाला. पण ते मागे हटले नाहीत. त्यांनी काढलेले उद्गार त्यांची भाजपानिष्ठा दाखवणारे मानले जातात, “संघ और भारतीय जनता पार्टी के संस्कार मेरे रक्त के बूंद-बूंद में समाए हुए हैं और इसीलिए मेरी इच्छा है कि मैं जीवनभर भाजपा में रहूं और जीवन का जब अंत होने को हो तो मेरा शव भी भाजपाके झंडे में लिपट कर जाए!”
त्यांच्या या इच्छेचा सन्मान राखण्यासाठीच त्यांच्या पार्थिवावर भाजपाचा झेंडा ठेवण्यात आला.
भाजपा नाही भारत मोठा!
भारताचा तिरंगा त्यांच्या पार्थिवावर ठेवण्याआधी जर भाजपचा झेंडा ठेवण्यात आला असता तर कुणीच आक्षेप घेतला नसता. पण राष्ट्रध्वज असणाऱ्या तिरंग्यावर भाजपच काय कोणत्याही पक्षाचा झेंडा ठेवला जाणं योग्य नाहीच. कुणीही, कधीही ते खपवून घेऊच नये. त्यातही राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर, व्यक्ती त्याहूनही नंतर असं सांगणाऱ्या भाजपाने तरी हे भान बाळगलेच बाळगले पाहिजे.
पण सध्या अंधभक्तीची चलती आहे. पक्ष कोणताही असो आंधळं समर्थन करणारेच आवडतात. त्यांचीच भरभराट होते. विरोधातीलच नाही तर स्वतंत्र भूमिका मांडणारेही खूपतात. कोणाचे अंधभक्त तर कोणाचे अंधभाट एवढाच काय तो फरक. पूर्वी राजेशाहीत राजदरबारी खूशमस्करे असायचे. ते राजाला बरं वाटेल तेच बोलायचे. तसे आता सर्व राजकीय पक्षांनी अंध समर्थक ठेवलेले असतात. भाजपाने त्यांच्या टोळ्या बाळगण्याचा कुभारंभ केला. आता सगळ्यांकडेच तशा टोळ्या आहेत. त्यातूनच मग अनेकदा भारतापेक्षा भाजपा मोठा अशीच भूमिका दिसते. भाजपाच्या सरकारवर केलेली टीका ही भारतावर केलेली टीका असल्यासारखे भासवून तसं करणाऱ्याला जणू राष्ट्रद्रोह केल्यासारखं वागवलं जातं. त्यासाठी अनेकदा ट्रोलिंगच्या ऑनलाइन झुंडगिरीचा वापर केला जातो.
कल्याण सिंहांना निरोप देताना भाजपाने झालेल्या चुकीतून हा धडा शिकलाच पाहिजे. भारतापेक्षा भाजपा मोठी नाही. इतरही कोणता पक्ष मोठा असूच शकत नाही.
भाजपाची जबाबदारी जास्त!
भाजपा केंद्रीय सत्तेत आहे. तसेच अनेकदा भाजपाचे नेते राष्ट्रभक्तीची सर्टिफिकेट ऑथोरिटी असल्यासारखेच वागतात. त्यामुळे भाजपाची जबाबदारी जास्त. भाजप आणि भारत यात भारतच मोठा हे भान भाजपनेच जास्त बाळगावं. त्यामुळे इतरांकडून कायम ठेवल्या जाणाऱ्या राष्ट्रप्रेमाच्या अपेक्षांनाही वजन येईल! नाही तर त्या राजकीय आश्वासनांसारख्याच पोकळ वाटतील. तसं होऊ नये. भाजप नाही तर भारतच मोठा!
ट्वीट -१
शान-ए-तिरंगा,
हम शर्मिंदा है 🙏
शान-ए-तिरंगा🇮🇳,
हम शर्मिंदा है 🙏 pic.twitter.com/pbM5fGAx4Y— Srinivas BV (@srinivasiyc) August 22, 2021
ट्वीट – २
तिरंगे का अपमान कब तक करते रहोगे ?
फ्लैग कोड ही पढ़ लो कम से कम
तिरंगे का अपमान कब तक करते रहोगे ?
फ्लैग कोड ही पढ़ लो कम से कम
— B. Kumar (@B_K_u_m_a_r) August 22, 2021
ट्वीट – ३
मीडिया चुप है क्यों कि बात भाजपा की है, अगर कोई और होता तो अब तक बहस शुरू हो चुकी होती?
तिरंगा बढ़ा या पार्टी?
यह तिरंगे का अपमान है???
मीडिया चुप है क्यों कि बात भाजपा की है, अगर कोई और होता तो अब तक बहस शुरू हो चुकी होती?
तिरंगा बढ़ा या पार्टी?
यह तिरंगे का अपमान है???— Taaj Ahmed (@TaajAhmed6) August 22, 2021
ट्वीट – ४
कोई fir दर्ज करवाओ भाई इनके खिलाफ संविधान भी कोई चीज है ये नेताओं को कोई सिखाओ भाई राहुलजी गाँधी कहा गए
https://twitter.com/KKVAIRAGI1/status/1429629541736009728?s=20
ट्वीट – ५
हां अपमान नही दिखा ?
यहां अपमान नही दिखा ? pic.twitter.com/oGPmgWJ8Mw
— Navjot Singh ਨਵਜੋਤ ਸਿੰਘ (@gillnavjot89) August 22, 2021
ट्वीट – ६
— अमित मुंडे- जय महाराष्ट्र 🚩🔥 (@RealAmitMundhe) August 22, 2021
ट्वीट – ७
तिरंगे के उपर भाजपा का झंडा!
स्वघोषित देशभक्त तिरंगे का सम्मान कर रहे हैं या अपमान???
तिरंगे के उपर भाजपा का झंडा!
स्वघोषित देशभक्त तिरंगे का सम्मान कर रहे हैं या अपमान??? pic.twitter.com/pM3TjSS2Up
— Indian Youth Congress (@IYC) August 22, 2021
ट्वीट – ८
आज़ाद हिंदुस्तान में 53 साल तक तिरंगा ना फहराने वाले आज भी तिरंगे का तिरस्कार करते हैं।
फ़र्ज़ी राष्ट्रवादी भाजपाईयों, तिरंगा हमारी शान है, इस पर सब क़ुर्बान है। लेकिन यह तुम नहीं समझोगे।
आज़ाद हिंदुस्तान में 53 साल तक तिरंगा ना फहराने वाले आज भी तिरंगे का तिरस्कार करते हैं।
फ़र्ज़ी राष्ट्रवादी भाजपाईयों, तिरंगा हमारी शान है, इस पर सब क़ुर्बान है। लेकिन यह तुम नहीं समझोगे। pic.twitter.com/6FFcVuEn4z
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) August 22, 2021
ट्वीट – ९
भारतीय ध्वज संहिता-2002 के नियम के अनुसार राष्ट्रीय ध्वज के ऊपर या बगल में कोई अन्य ध्वज नही लगाया/रखा जा सकता है।
ये राष्ट्रद्रोह है।
भारतीय ध्वज संहिता-2002 के नियम के अनुसार राष्ट्रीय ध्वज के ऊपर या बगल में कोई अन्य ध्वज नही लगाया/रखा जा सकता है।
ये राष्ट्रद्रोह है। pic.twitter.com/IvmaRjmZWf
— Abhay Tiwari (@AbhayIndia) August 22, 2021
(तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठ या मुक्त माध्यम उपक्रमाचे संपादक आहेत)
संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite
हेही वाचा: कुबेरांच्यावेळी शांत, राज ठाकरेंच्यावेळी आकांत!
महाराजांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर तरी नकोच दुटप्पीपणा!