मुक्तपीठ टीम
उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या तुळजापूरजवळच्या “बोरी नदीच्या” खोलीकरणासाठी दिवस-रात्र एक करणाऱ्या पंकज शहाणेंच्या मेहनतीला यश येतंय. निसर्गाच्या कृपेनं त्यांचं यश आता बोरी नदीतून दुथडी भरून वाहतंय. पंकज शहाणेंचं स्वप्न आहे तुळजापूर तालुका सुजलम् करणे आहे. त्या भगिरथ कार्यासाठी आज अनेकांचे हात साथ देण्यासाठी सरसावले. पण त्याने ते सुरु केले तेव्हा वापरले आपल्या आईचे निवृत्तीवेतन. सोबत होती त्यांची पत्नी.
मुक्तपीठ मित्र परिवारातील प्रणव कांबळे यांनी पंकज शहाणे यांना मराठवाड्याचा मांझी संबोधलं आहे. पंकज शहाणेंच्या भगिरथ परिश्रमाच्या पहिल्या टप्प्याला तुडुंब यश मिळत असताना आपल्या मांझीची कहाणी प्रणव यांच्याच शब्दात पुन्हा एकदा.
आता या माणसाला तुम्ही “मांझी” म्हणा किंवा “आधुनिक भगिरथ” म्हणा किंवा अगदी सत्यमेव जयतेचा “सत्यजित भटकळ”.
मांझीने एकट्याने मेहनत डोंगर फोडला, भागिरथाने तपस्याकरून गंगा आणून दिली, तर सत्यजित भटकळ म्हणतात तुम्ही मेहनत करा मी पद्धत सांगतो. या तिन्ही गोष्टीबरोबर सोबतच पंकज शहाणे म्हणतात “या, चला खोलीकरणाचे काम आपण मिळून करू”.
“एकला चलो रे” ने सुरवात करून आता “कंधोसे मिलते है कंधे” याप्रमाणे गेली ३४ दिवस खोलीकरणाचे अतिशय उत्तम काम सुरू आहे.
एक-एक इंचाच्या बांधासाठी भांडणारे लोकांच्या शेताजवळून नदी खोलीकरणाचं काम चालू करणं हे सोपे नाही. पण आईच्या निवृत्तीवेतनाचे पैसे, स्वत:च नाही तर पत्नी आणि गावकऱ्यांची साथ यातून पंकज अशक्य ते करून दाखवत आहेत. मुक्तपीठ टीमचा पंकज शहाणेंना मानाचा मुजरा.
(आपल्याही गावात, शहरात, चाळीत, सोसायटीत असं कुणी असेल तर हक्कानं ९८३३७९४९६१ या क्रमांकावर कळवा.)