Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेतर्फे २५ सप्टेंबरला रंगणार ‘त्रिवेणी संगम’

September 8, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Triveni Sangam

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशनच्या वतीने २५ सप्टेंबर हा दिवस ‘आई सन्मान दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्त ‘त्रिवेणी संगम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते त्रिवेणी संगमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी त्यांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. प्रशांत रोकडे यांनी दिली.

प्रा. प्रशांत रोकडे म्हणाले, “प्रसिद्ध कवी शंकर आथरे लिखित ‘द्वारका’ कादंबरीचे प्रकाशन, ‘श्यामची आई बंधुता पुरस्कार’ वितरण आणि ‘माझी आई’ बंधुता काव्य संमेलन असा हा त्रिवेणी संगम असणार आहे. शिवाय, साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. संगीता बर्वे यांना मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम रविवार, दि. २५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. यावेळी त्रिवेणी संगमाचे स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनुसयाबाई आथरे (नाशिक), सीताबाई कदम (बीड), प्रकाशक प्रा. चंद्रकांत वानखेडे आदी उपस्थित राहणार आहेत.”

अकरा आदर्श माता-पुत्रांचा ‘श्यामची आई’ हा बंधुता पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये अशोक आणि सीताबाई कदम (बीड), विद्या आणि रंजनाताई पाचंगे (पुणे), विनोद आणि कांताबाई गलांडे पाटील (पुणे), नारायण आणि वेणूबाई खेडकर (पाथर्डी), भैरू आणि राजूबाई कांबळे (बीड), रवींद्र आणि सुलोचना यशवंतराव (मुरबाड), अनुप्रिया आणि मेधा जोगळेकर (तळेगाव), गोरखनाथ आणि शालूबाई लामखडे (निघोज), गोपाळ आणि शरणाबाई कांबळे (पुणे), अभ्युदय आणि प्रमिला वाघमारे (चिखली), गणेश आणि फुलाबाई केदारी (सांगवी) यांचा समावेश आहे.

उत्तरार्धात होणाऱ्या ‘माझी आई’ या बंधुता काव्यसंमेलनात संतोष शेळके (नेरळ), अनिल काळे (हिंगोली), सचिन शिंदे (उमरखेड), पल्लवी पतंगे (मुंबई), मधुश्री ओव्हाळ (पुणे), सुमन आव्हाड (पुणे), उदय क्षीरसागर (भिवंडी), नरेंद्र पाटील (धुळे), वैशाली माळी (कोल्हापूर), विजय माळी (धुळे) आणि जयश्री शेहणकर (अमरावती) हे निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत, असे त्यांनी नमूद केले.

पाहा:


Tags: good newsmuktpeethNational Brotherhood Sahitya ParishadTriveni Sangamचांगली बातमीत्रिवेणी संगममुक्तपीठराष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद
Previous Post

२५ देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतलं मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन

Next Post

मीशोचा फेस्टिव्ह “मेगा ब्लॉकबस्टर सेल”, लघु उद्योजकांच्या सहभागात वाढ

Next Post
Meesho

मीशोचा फेस्टिव्ह "मेगा ब्लॉकबस्टर सेल", लघु उद्योजकांच्या सहभागात वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!