मुक्तपीठ टीम
पाच राज्यातल्या निवडणुकांमध्ये सर्वात महत्वाची लढत असलेल्या बंगालच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याचं पाहायला मिळत आहे. बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसची सत्ता आली आहे. गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्याच हाती मतदारांनी सत्तेची चाव दिलीय. ममता बॅनर्जींसमोर भाजपने कडवं आव्हान उभं केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा, पक्षाध्यक्ष नड्डा यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरुन जोरदार प्रचार केला होता. पण दोनशेपारचा दावा शंभरीतच रखडलेला दिसत आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निकाल – ताजे कल
- बहुमताचा आकडा – १४८
- तृणमूल काँग्रेस – २१४
- भाजप – ७७
- डावे+काँग्रेस – ०
- इतर – १
- एकूण जागा – २९२
पश्चिम बंगालसाठी काय होते एक्झिट पोलचे अंदाज?
- तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये २९२ जागांसाठी निवडणुका पार पडल्या असून एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेस सत्ता टिकवून ठेवेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
- एबीपी सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १५२-१६४ जागा, भाजपला १०९-१२१ जागा, काँग्रेस- डाव्या पक्षांना १४-२५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
- इटीजी रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १६४-१७६ जागा, भाजपला १०५-११५ जागा, काँग्रेस- डाव्या पक्षांना १०-१५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
- पी-एमएआरक्यूरच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १५२-१७२ जागा, भाजपला ११२-१३२ जागा, काँग्रेस- डाव्या पक्षांना १०-२० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
- सीएनएन न्यूज १८च्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १६२ जागा, भाजपला ११५ जागा, काँग्रेस- डाव्या पक्षांना १५ जागा.
- रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १२८-१३८ जागा, भाजपला १३८-१४८ जागा, काँग्रेस- डाव्या पक्षांना ११-२१ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
- टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १५८ जागा, भाजपला ११५ जागा, काँग्रेस- डाव्या पक्षांना १९ + जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.