मुक्तपीठ टीम
भारतीय कुठचाही असो. शिकलेला किंवा अशिक्षित, शहरी किंवा ग्रामीण, जात धर्म भाषा कोणतीही असो. ज्याही माणसामुळे, जिथंही तिरंगा अभिमानानं फडकवला जातो तिथं तिथं भारतीयांच्या मनात अभिमान उंचबळून येतोच येतो. त्यामुळे गणेशोत्सवात कोरोना नियमांचे बंधन असूनही त्या मर्यादेत अनेक मंडळांनी आपल्या ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक पदक विजेत्यांना सजावटीतून मानवंदना दिली.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधील घोटेगावातील श्री सार्वजनिक मंडळ अशांपैकीच एक. या गावातील तरुणांनी ठरविले की यावेळी बाप्पापुढे सजावट करायची ती आपल्या खेळाडूंना मानवंदना देणारी. त्यातून त्यांचं कौतुक करायचंच. पण त्याचवेळी ग्रामीण भागातील उगवत्या खेळाडूंनाही प्रेरणा द्यायची. अशक्य काही नसतं. ठरवलं तर तुम्हीही गाव ते ग्लोबल झेप घेऊ शकता. स्वत:मधील प्रतिभेला परिश्रमांची जोड दिली तर यश मिळवणं अशक्य नसतंच नसतं. गावात उभारलेल्या या देखाव्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्या गावातील गावकरी माजी शिक्षक जितेंद्र पाटील यांच्या शब्दात ऐका देखाव्याची संकल्पना…
देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांमुळे कोरोना सुरक्षा नियम मोडले जाऊ नयेत यासाठी सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. मंडळाचे कार्यकर्ते त्यासाठी खास सतर्क आहेत. त्याचबरोबर सुरक्षित अंतर राखणे, मास्कशिवाय दर्शन नाही असे अनेक चांगले नियम गणेश भक्तांच्या सहकार्याने पाळले जात आहेत.
घोटेगाव श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते
- अध्यक्ष- करण विष्णू पाटील
- उपाध्यक्ष- रोशन रमेश पष्टे
- सचिव – सचिन पांडुरंग ठाकरे
- खजिनदार- रूपम दयानंद पाटील
- सदस्य:
सागर यशवंत पाटील, रोशन जगन्नाथ पाटील, अक्षय कमलाकर पाटील, प्रसाद बळीराम पाटील, हर्षल कमलाकर पाटील, संकेत सोपान पाटील, मनीष सुदाम पाटील, प्रतीक चंद्रकांत पाटील, करण प्रमोद पाटील, जिग्नेश सिताराम ठाकरे, प्रनित दयानंद पाटील, हर्षल मधुकर पाटील, विजय नारायण वाघेरे, परीस दत्तात्रय पाटील, नितेश पाटील, दीप पाटील
पाहा व्हिडीओ