Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“न भरून येणारी पोकळी…आवाजाचा परिसस्पर्श मनांमध्ये गुंजत राहणार…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या मनातील भावना शब्दांमध्ये...

February 6, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Lata Mangeshkar

मुक्तपीठ टीम

गाणकोकिळा, स्वरलता या आणि अशा अनेक उपाध्यांनी ज्यांचा जगभरात गौरव होत राहिला अशा लता मंगेशकरांचं जाणं संगीत रसिकांना हेलावून जाणारं ठरलं आहे. विशेष म्हणजे घरचंच कुणीतरी गेल्यासारखं शोकमग्न झालेल्यांमध्ये रस्त्यावरच्या सामान्य संगीत रसिकांपासून पंतप्रधानपदावरील नरेंद्र मोदींपर्यंत अनेकांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मनातील भावना शब्दांमध्ये…

 

न भरून येणारी पोकळी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

I am anguished beyond words. The kind and caring Lata Didi has left us. She leaves a void in our nation that cannot be filled. The coming generations will remember her as a stalwart of Indian culture, whose melodious voice had an unparalleled ability to mesmerise people. pic.twitter.com/MTQ6TK1mSO

— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2022

मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या लतादीदी आम्हाला सोडून गेल्या. त्या सोडून गेल्यानं एक पोकळी निर्माण झालीय, जी कधीही भरून येणार नाही. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतल्या एक दिग्गज म्हणून स्मरणात ठेवतील. त्यांच्या मधूर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

लतादीदींच्या आवाजाचा परिसस्पर्श मनांमध्ये गुंजत राहिल…- शरद पवार

 

जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले.
लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/U9Nhn1KrpE

— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 6, 2022

जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले.
लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

 

भारतीय संगीताचा आत्मा हरपला… – देवेंद्र फडणवीस

 

लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे.
भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही.
ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे.
आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे. #LataMangeshkar pic.twitter.com/D0sZI0x2RY

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 6, 2022

लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे.
भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही.
ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे.
आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे.

 

अजरामर गाण्यांमुळे लतादिदी सदैव आपल्यासोबत असतील – चंद्रकांत पाटील

 

भारताचा सुमधुर सूर हरपला !
लता दीदी आपल्याला सोडून गेल्या या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाही. त्यांच्या हजारो गाण्यांचा सुरेल प्रवास आणि आवाज अजरामर राहणार आहे. संगीत क्षेत्रातील या प्रतिभासंपन्न महागायिकेला भावपूर्ण श्रद्धांजली !🙏🏼 pic.twitter.com/RCdvohh3Wq

— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 6, 2022

संपूर्ण जगाला आपल्या आवाजाने अनेक दशके मंत्रमुग्ध करणाऱ्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. तथापि, आपल्या अजरामर गाण्यांमुळे त्या सदैव आपल्यासोबत असतील, अशी श्रद्धांजली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्पण केली.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, दैवी सुरांमुळे आणि अलौकिक गायनामुळे लता मंगेशकर यांना देशातील घराघरात आणि मनामनात स्थान मिळाले आहे. आयुष्यातील सुखदुःखाच्या अशा दोन्ही प्रसंगात लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी मनाला साद देतात. महान गायिका असण्यासोबतच त्या तितक्याच देशभक्त होत्या. त्यांना आपल्या देशाच्या संस्कृतीचा अभिमान होता. तसेच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली होती. आपण त्यांना भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.


Tags: chandrakant patildevendra fadanvisGankokilalata mangeshkarMaharashtramumbaiNarendra modisharad pawarगानकोकिळागानसम्राज्ञी लता मंगेशकरचंद्रकांत पाटीलदेवेंद्र फडणवीसपंतप्रधान नरेंद्र मोदीमहाराष्ट्रमुंबईशरद पवार
Previous Post

“शेतकरी आंदोलनातील ७०० शेतकऱ्यांचा मृत्यूचा परिणाम निवडणुकीत दिसून येईल” – जयंत पाटील

Next Post

‘लता’ नावामागची कहाणी: का बदललं पंडित दिनानाथ मंगेशकरांनी दीदींचं नाव?

Next Post
Lata mangeshkar

'लता' नावामागची कहाणी: का बदललं पंडित दिनानाथ मंगेशकरांनी दीदींचं नाव?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!