डॉ. जितेंद्र आव्हाड
“एक वेळ जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण वसतिगृहाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलणारं नाही.”
अस छातीठोकपणे सांगणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील विशेषतः बहुजन समाजाला शिक्षणाची गरज आहे हे त्यांनी शंभर वर्षापूर्वीच ओळखले. लोकशाहीचा मूळ गाभा हे लोकशिक्षण आहे. हे लोकशिक्षण समाजाला विकासाकडे नेते हे भाऊराव पाटील यांना ज्ञात होत म्हणून त्यांनी अनवाणी पायांनी वणवण फिरून अवघा महाराष्ट्र पिंजून काढून, ज्ञानाचा दिवा महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात पेटऊन शिक्षणाची गंगोत्री इथल्या तमाम बहुजनांच्या घराघरात, झोपडीत पोहचविली.
आशियातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणजेच रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
या संस्थेच्या माध्यमातून भाऊराव पाटील यांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून
“कमवा आणि शिका” ही संकल्पना स्वीकारून बहुजनांच्या मुलांना शिक्षण घेणे अधिक सोपे केले.
मागासलेल्या गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले. निरनिराळ्या जातीधर्मातील लोकांना बंधुभाव शिकविला.
याच काळात त्यांचा सत्यशोधक चळवळीशी जवळून संबंध आला. त्यांच्यावर महात्मा फुले यांचा प्रभाव होता. महात्मा फुले यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन त्यांनी शिक्षणाच्या प्रसाराचे कार्य केले.घराघरातून पैसे जमवत त्यांनी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला.
“प्रत्येक गावात शाळा, बहुजन समाजातील शिक्षक व शिक्षक प्रशिक्षण या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत महाराष्ट्रातील जनतेने त्यांना “कर्मवीर” पदवी भाऊराव पाटील यांचा गौरव केला.
तसेच भारत सरकारने देखील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आज भाऊराव पाटील यांची जयंती. आजच्या जयंतीदिनी त्यांच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन…!