मुक्तपीठ टीम
आपले आदिवासी जंगलात राहतात. ते जंगलाचे राजेच. आपल्यासारख्या शहरी सोयीसुविधा नसतील. पण त्यांचं जीवन कसं स्वयंपूर्ण. जंगलात भटकताना पाणी संपलं तर नदीचं पाणी स्वच्छ करून कसं झटपट प्यायचं, याचंही त्यांचं एक तंत्र आहे.
पालघर जिल्ह्यातील एका आदिवासी शेतकऱ्यांने एक भन्नाट उपाय सांगितला आहे. कधीकाळी जर, जंगलात भटकताना पाणी संपलं तर नदीचं पाणी स्वच्छ करून कसं झटपट प्यायचं, ते दाखवलं आहे. नदीचं पाणी कसं गाळाविना पिता येईल याचा सोपा मार्ग त्यांनी यातून दाखवला आहे.
जंगलात भटकणं आपल्यापैकी बहुतेकांना आवडतं. डोंगरकपारी. नद्या. लांबचलांब पायवाटा. सारंच मनाला मोहवणारं. पण अनेकदा अंदाज चुकतो. आपल्याला वाटतं त्यापेक्षा भटकंती लांबते. सोबतचं पाणी संपतं. जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर तहानेनं जीव कासावीस होतो. त्यावेळी एखादी नदी जरी दिसली तरी पाण्याच्या शुद्धतेविषयीच्या शंकेमुळे शहरी मन ते पिण्यास तयार होत नाही. अशाच एका जंगलवारीत आदिवासी समाजातील एका व्यक्तीनं नदीचं पाणी झटपट शुद्ध करुन कसं प्यायचं ते दाखवलं. तुम्ही ते या बातमीसोबतच्या व्हिडीओत प्रत्यक्षच पाहा…
कडाक्याच्या वणवणत्या उन्हात तहान लागते. याक्षणी पाणी नसल्यास तहाणेने जीव कासावीस होतो. जर जंगलात किंवा डोंगराळ भागात असं घडल्यास चिंतेची बाब नाही. कारण, जर तिथे आजू-बाजूला नदी किंवा तळे असल्यास पाणी शुद्धीकरणाची एक सोपी पद्धत आहे. आदिवासींचे हे सोपे तंत्र आहे. नदीच्या किनाऱ्या लगतच एक छोटा खड्डा खोदायचा याला त्यांच्या भाषेत विहीरा असे म्हणतात. त्या विहीरामध्ये पाणी स्वच्छ होते आणि साचते आणि ते पिण्यायोग्य बनते. असा हा सोपा उपाय आहे.
जंगलात फिरताना आदिवासी मित्रानं दाखवलेला नैसर्गिक जुगाड महत्वाचा. ते पाणी अगदी जीवाणूविरहित झालंच असेल असं नाही. पण किमान त्यातल्या त्यात ते स्वच्छ झालं आहे. रेतीतून गाळलं गेल्यामुळे बऱ्यापैकी स्वच्छ झालं. सोबत सध्या बाजारात मिळणाऱ्या काही गोळ्या ठेवल्या तर इतर काही धोकाही दूर करता येईल. पण काहीच नसेल तर हा नैसर्गिक जुगाड खूपच उपयोगी असा…
पाहा व्हिडीओ: