थोडक्यात महत्वाचं १) पुणे जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेतून मागेल त्याला काम देण्यास सुरुवात केली, त्यासाठी १०० दिवस कामाचे उपक्रमाची सुरुवात २) नाशिक जिल्ह्यातील बागलाण पंचायत समितीचे उपसभापती शिवसेनेचे कान्हू अहिरे यांनी अचानक राजीनामा दिला, पद पटकावण्यासाठी इच्छुकांच्या हालचाली ३)काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदींच्या डोळ्यात अश्रू, निरोप देताना केले भावूक भाषण ४)“शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांच्या जिवंतपणीच श्राद्धे घातली असा महाराष्ट्राचा इतिहास सांगतो,” शिवसेना नेते खा. संजय राऊतांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना प्रत्युत्तर ५)उत्तराखंड आपत्तीच्या तिसऱ्या दिवशीही शोध मोहीम सुरुच, ३५ कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम ६) जगातील १५ प्रमुख शेअर बाजारांमध्ये मुंबई शेअर बाजार दुसऱ्या क्रमांकावर, मार्केट कॅपिटलमध्ये सौदी अरेबिया आणि कॅनडालाही मागे टाकले ७)बंगालमध्ये भाजपने संपूर्ण बळ उतरवले, नरेंद्र मोदी, अमित शाहांनंतर जे.पी.नड्डा, स्मृति इराणी, राजनाथ सिंह प्रचार युद्धात सहभागी म्यानमारमध्ये लष्करी ८)राजवटीच्याविरोधात जनता रस्त्यावर, संचारबंदीची पर्वा न करता लोकशाहीसाठी आंदोलन ९) अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगास बुधवारपासून सुरुवात, समर्थकांना चिथावून कॅपिटल हिल परिसरात हिंसाचाराचा आरोप १०)पंतप्रधान नरेंद्र मोदींची अमेरिकेच्या अध्यक्षांशी फोनवर चर्चा, जो बायडन यांच्या शपथविधीच्या १९ दिवसानंतर संवाद