मुक्तपीठ टीम
किसान रेल्वेच्या माध्यमातून देशभरातील शेतीमाल इतरत्र पोहचवण्यात रेल्वे मोठी कामगिरी बजावत आहे. आता महाराष्ट्रालाही त्याचा लाभ मिळणार आहे.
पहिल्यांदाच भारतीय रेल्वेने सोयाबीनच्या बियाण्यांची वाहतुकीसाठी व्यवस्था केली. सोयाबिन उत्पादक मराठवाड्याच्या परभणीपासून गुजरातमधील गांधीधामपर्यंत रेल्वेने सोयाबीन पोहचवण्यात आली. जवळजवळ २,६६१ टन सोयाबीन बियाण्यांनी भरलेल्या एकूण ४२ बोगी परभणी येथून गुजरातच्या गांधीधाम येथे आहेत.
“मराठवाडा सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत मराठवाडा आणि विदर्भातील जवळपासच्या उद्योगांना सोयाबीन साधारणपणे रस्त्याने वितरीत केले जात होते. नांदेड विभागात व्यवसाय विकास युनिटच्या प्रयत्नांमुळे सोयाबीनच्या रूपात मालवाहतुकीसाठी नवे क्षेत्र दिसले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे, असे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सी. राकेश यांनी सांगितले.
एससीआरचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, “शेतकऱ्यांनी रेल्वे वाहतुकीचा लाभ घ्यावा कारण, भारतीय रेल्वे ही सर्वात सुरक्षित आणि जलद वाहतुकीचे साधन आहे, ज्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागत नाही.
एससीआरने आपल्या कार्यक्षेत्रात १०० वे किसान रेल्वे लोड करीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अनंतपूर येथून प्रथम किसान रेल्वे सुरू झाल्यापासून सुमारे सहा महिन्यांच्या कमी कालावधीत वेळात ही कामगिरी झाली आहे.
पाहा व्हिडीओ: