मुक्तपीठ टीम
रेल्वे गाड्यांशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी किंवा रीअल-टाईम पीएनआर स्टेट्स तपासण्यासाठी आता आपल्याला वेगवेगळ्या साइट किंवा अॅप तपासण्यची गरज नाही आहे. कारण व्हॉट्सअॅपवर एकाच मेसेजमुळेच ही सर्व कामे पूर्ण केली जातील.
मुंबई बेस्ड स्टार्टअप कंपनी रेलॉफीने ही सेवा सुरू केली आहे. ज्यामध्ये रेल्वे प्रवासाची माहिती आणि पीएनआर स्टेट्सची माहिती प्रवाशांच्या व्हॉट्सअॅपवर दिली जाईल. यामध्ये ट्रेनविषयीची सर्व माहिती काही मिनिटातच मिळेल. यासाठी, फोनमध्ये +९१-९८८११९३३२२ हा नंबर सेव्ह करावा लागेल. यानंतर, या क्रमांकावर आपला १०-अंकी पीएनआर नंबर लिहून पाठवावा लागेल. त्यानंतर काही सेकंदानंतर, मेसेजवरच ट्रेनशी संबंधित सर्व माहिती मिळेल.
ही सेवा आपल्यासाठी पूर्णपणे विनामूल्य आहे. जेव्हा एखाद्या नेटवर्क नसलेल्या ठिकाणी प्रवास करत असाल तेव्हा सुद्धा ही सेवा आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. आपणास ही सेवा थांबवायची असल्यास स्टॉप(एसटीओपी) लिहून संदेश पाठविल्यानंतर ती बंद केले जाऊ शकते.
पाहा व्हिडीओ: