मुक्तपीठ टीम
अनेकवेळा लक्षात आणून देखीलही एसएमएस रेगुलेशन अंतर्गत बल्क कमर्शियल संदेश गाइडलाइन्स पूर्ण केले नसणाऱ्यांची एक यादी भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण (ट्राय)ने जारी केली आहे. यात एचडीएफसी, एसबीआय, आयसीआयसीआय बँक आणि एलआयसीसारख्या मोठ्या संस्थांचा समावेश आहे. दरम्यान, ‘ट्राय’ने सर्व ऑपरेटर्सना १ एप्रिल पासून नवीन एसएमएस नियम पूर्णतः लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेच. यानुसार त्यांना कंपन्यांद्वारे संदेशांना ब्लॉक करण्याच्या सूचनाही देण्यात आले आहेत.
ट्रायने दिला हा इशारा
ट्रायने हे स्पष्ट केले आहे की, डिफॉल्टर कंपन्यांनी संबंधित सर्व नियम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावेत अन्यथा ग्राहकांपर्यंत पोहचणाऱ्या या सेवेला बंद करण्यात येईल. ट्रायच्या म्हणण्यानुसार, “एसएमएसशी संबंधित नवीन मार्गदर्शक सूचना लागू करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे, स्क्रॅबिंग प्रक्रियेविना १ एप्रिलपासून ग्राहकांना पाठविण्यात आलेले कमर्शियल एसएमएस रिजेक्ट करण्यात येतील”.
नियमांकडे दुर्लक्ष
ट्रायने यादी जारी करताना म्हटले की, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक लिमिटेड, पंजाब नॅशनल बँक यासारख्या मोठ्या बँकां तसेच बऱ्याच मुख्य संस्था कन्टेंट टेम्पलेट आयडी, पीई, आईडी अशा अनिवार्य पॅरामीटर्सकडे दुर्लक्ष करीत आहे. याव्यतिरिक्त ट्रायने अशा टेलीमार्केटरची यादी देखील जारी केली आहे, ज्यांनी अद्याप एसएमएस प्रक्रियेत नवीन मार्गदर्शक तत्वे लागू केलेली नाहीत.
केंद्र, राज्य सरकारला केला आग्रह
ट्रायने भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), विमा नियामक विकास प्राधिकरण (आयआरडीए) यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधित विभागांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील संस्थांद्वारे नवीन नियम लागू करण्याचा आग्रह केला. तसेच कोणतीही संस्था या नियमाकडे दुर्लक्ष करत असेल तर स्क्रॅबिंग प्रक्रियेअंतर्गत ट्राय त्या एसएमएस रिजेक्ट करु शकेल.