मुक्तपीठ टीम
कोरोना संकटात संसर्ग टाळण्यासाठी अवघ्या देशानं काळजी घेतली. स्वत:ला लॉक करून भारतीयांनी कोरोनाला बऱ्यापैकी डाऊन केले आहे. त्यामुळे सुरु झालेल्या अनलॉक प्रक्रियेत हिमालयातील पर्यटनही सुरु झाले आहे. १३ हजार ५० फूट उंच असणाऱ्या रोहतांग आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळावर पर्यटकांची रिघ लागली आहे. एनजीटीच्या आदेशासह कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर पर्यटकांना रोहतांगला जाण्याची परवानगी देण्यात आली.
पहिल्या दिवशी वाहनांची संख्या कमी होती. पण पहाटे पर्यटकांच्या वर्दळीने रोहतांग बहरलेला होता. मनाली प्रशासन सध्या केवळ स्थानिक पर्यटक वाहनांना रोहतांगला जाण्यास परवानगी देत आहे. पण परिस्थिती सामान्य झाल्यावर पर्यटकांना ऑनलाइन परमिट मिळवून रोहतांगला जाता येईल.
राज्य सरकारने कोरोना अहवालावर पर्यटकांना परवानगी दिल्यानंतर मनालीतील पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. राज्यभरातून शंभराहून अधिक वाहने पोहोचत आहेत, तर इतर राज्यातून येणाऱ्या पर्यटक वाहनांची संख्याही पाचशेहून अधिक आहे. पर्यटकांच्या गर्दीत वाढ होत असताना, टॅक्सी चालक आणि हॉटेलवाल्यांसह पर्यटनाशी संबंधित प्रत्येक व्यवसायांना दिलासा मिळाला आहे.
पर्यटनासाठी इलेक्ट्रिक लक्झरी बस
• लवकरच पर्यटकांना लाहुल खोऱ्यात शीत वाळवंटातील आनंददायक प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
• एचआरटीसीने केलंग मनाली दरम्यान लक्झरी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे.
• लवकरच इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली जाईल.
• लाहुल स्पीती प्रशासनाने चंद्रताल, शिंकुला, सरचू, बरलाचा यासह लाहुलची सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी उघडली आहेत.
• आरोग्य विभाग सर्व हॉटेलमध्ये आणि ढाब्यांवर कर्मचार्यांच्या चाचण्या घेतात.